शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

शरद पवार यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ मंठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:43 AM

शरद पवार यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मंठा शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना / मंठा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक राजकीय सूडबुद्धीने ईडीतर्फे गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मंठा शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला प्रतिसाद मिळाला. तसेच जालना, देऊळगाव राजा, आष्टीसह जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवित निवेदने दिली.जालना येथे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे यांच्यासह तय्यब देशमुख, राजेंद्र जाधव, जयंतराजे भोसले, मिर्झा अन्वर बेग, मोहन क्षीरसागर, जहीर बागवान, मनोज देवरे, कुणाल क्षीरसागर, ज्ञानेश्वर धानुरे, फिरोज कुरेशी आदींची उपस्थिती होती.मंठा येथील फाट्यावर गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोपाळराव बोराडे, काँग्रेसचे प्रदेश सचिव राजेश राठोड, भाऊसाहेब गोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश अवचार, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले, उपनगराध्यक्ष सिराजखान पठाण, राजेश खंदारे, सोनाबापू बोराडे, विष्णूपंत बोराडे, अंकुश वायाळ, कबीर तांबोळी, अच्युत बोराडे व कार्यकर्त्यांनी फेरी काढून घोषणाबाजी केली. बंदमध्ये येथील व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला. फेरीचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप झाला.आष्टी येथेही बंद पाळण्यात आला. सपोनि एस.बी.सानप यांच्या मार्फत शासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गावातून रली काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बळीराम कडपे, रमेशराव सोळंके, कपिल आकात, नितीन जेथलिया, भगवान थोरात, सादेक जहागीरदार, विक्रम तौर, उत्तम पवार, गौतम शेळके, मनोज सोळंके, ओंकार काटे, राजेभाऊ आघाव, सत्तार कुरेशी, मंजुळदास सोळंके, लक्ष्मण सोळंके, शिवाजी सोळंके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.देऊळगाव राजा येथे बंदबुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा येथेही राष्ट्रवादीच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये व्यापा-यांनी सहभाग नोंदविला. यावेळी तुकाराम खांडेभराड, जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर जाधव, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, कविश जिंतूरकर, जिल्हा प्रवक्ते अर्पित मिनासे, तालुकाध्यक्ष राजीव शिरसाट, नगरसेवक विष्णू रामाने, गजानन पवार, राजेंद्र खांडेभराड, गणेश सवडे, रामू खांडेभराड, दत्ता काळे, धनू मोहिते, दिनकर जाधव आदींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसagitationआंदोलन