सौभाग्यलेण्यावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 01:07 IST2019-01-17T01:05:58+5:302019-01-17T01:07:37+5:30

समर्थनगर परिसरामध्ये संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकूवास जाणाऱ्या एका महिलेल्या गळ्यातील मंगळसूत्र दोन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बुधवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान लंपास केले.

Mangalsutra snatched | सौभाग्यलेण्यावर डल्ला

सौभाग्यलेण्यावर डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुना जालना भागातील समर्थनगर परिसरामध्ये संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकूवास जाणाऱ्या एका महिलेल्या गळ्यातील मंगळसूत्र दोन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी बुधवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान लंपास केले.
मकर संक्रातीनिमित्त सध्या एकमेकींकडे हळदी-कुंकवाला जाण्यासाठी महिलांची गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेत समर्थनगरमध्ये दोन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे मंगळसूत्र लांबविल्याने खळबळ उडाली आहे. सदर महिलेने आरडाओरड केली असता स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी त्याच भागात असल्याने बोर्डे यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु ते वेगात पसार झाले.
घटनेची माहिती मिळाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी भेट देऊन
परिसराची नाकाबंदी केली.

Web Title: Mangalsutra snatched