शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Maharashtra Election 2019 : आजी-माजी खासदाराच्या मुलांमध्ये रंगणार सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 20:35 IST

६ उमेदवार निवडणुकीच्या रिंंगणात 

ठळक मुद्दे संतोष दानवे विरुध्द चंद्रकांत दानवे यांच्यात लढत

- फकीरा देशमुख

भोकरदन विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले तरी खरी लढत ही  केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आ. संतोष दानवे व मा. खा. पुंडलिकराव दानवे यांचे पुत्र राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आ. चंद्रकांत दानवे यांच्यात होईल. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष आहे. 

भोकरदन विधानसभा मतदार संघात दीपक बोºहाडे (वंचिंत बहुजन आघाडी), निवृत्ती बनसोडे (बसपा), राजू गवळी (भारतीय ट्रायबल पार्टी), मुजाहिद अब्दुल बारी सिद्दीकी (अपक्ष) हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. या मतदारसंघात भोकरदन तालुक्यातील ९४ तर जाफराबाद तालुक्यातील १०१ गावांचा समावेश होतो. जाफराबाद तालुक्यातील मतदारांची संख्या कमी असल्याने  येथे आतापर्यंत भोकरदनचाच आमदार राहिला आहे.  

२०१४ च्या निवडणुकीत संतोष दानवे यांनी  चंद्रकांत दानवे यांचा साडेसहा हजार मतांनी पराभव केला होता. त्यापूर्वीच्या तिनही निवडणुकींमध्ये चंद्रकांत दानवे यांनी विजय संपादन करून हॅटट्रिक केली होती. १९९० पर्यंत हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता.  मात्र त्यानंतर येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी वर्चस्व निर्माण केले. त्यांनी १९९० व १९९५ अशा दोन्ही निवडणुका जिंकल्या.  त्यानंतर दानवे लोकसभेसाठी उभे राहिले. या मतदारसंघात रावसाहेब दानवे यांची गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून सत्ता आहे. सहकार, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहे. केवळ भोकरदन नगरपरिषद ही काँग्रेसच्या ताब्यात आहे. तर जाफराबादची नगर पंचायतही भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळे यंदा संतोष दानवे बाजी मारतात की, राष्ट्रवादीचे माजी आ. चंद्रकांत दानवे निवडून येतात, हे येणाऱ्या काळातच समजेल.

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- मतदार संघात मका, सोयाबीन, मिरची या पिकांवर प्रक्रिया करणारा एकही उद्योग नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. भोकरदन मतदार संघात जि.प. तसेच राज्य सरकारच्या आरोग्य सेवेकडे अधिक देण्याची गरज आहे. - भोकरदन, जाफराबाद येथे औद्योगिक वसाहती आहे. मात्र या ठिकाणी कोणताही मोठा उद्योग उभा राहिला नाही. त्यामुळे बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ शिवाय भोकरदन येथे बस आगाराचा प्रश्न प्रलंबित.- खडकपुर्णा येथुन होणारी सिल्लोड -भोकरदन संयुक्त पाणीपुरवठा योजना प्रलंबित पडलेली आहे़ भोकरदन , जाफराबाद शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण धारकांचा गाळ्याचा प्रश्न. क्रीडा संकुलाचे काम अर्धवट. अशी अनेक प्रश्न मतदार संघात अद्यापही प्रलंबित आहेत. 

प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची जमेची बाजूसंतोष दानवे (भाजप)- सहकार क्षेत्रात मोठे काम. सत्ता असल्याने मतदार संघात केलेली कामे.  - शैक्षणिक संस्थांचे जाळे, साखर कारखाना. नव्या व जुन्या कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा.- पं. स, कृऊबा समिती ताब्यात. दांडगा जनसंपर्क व तरूणांना केले आकर्षित.

चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी -काँग्रेस)- सत्तेत असताना मतदार संघात २२० केव्ही केंद्राची उभारणी करुन विजेचा प्रश्न निकाली काढला. - त्याचप्रमाणे गावागावात प्रत्येक समाजाला दिलेले सामाजिक सभागृह.अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून केलेली मदत. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

दीपक बोºहाडे (वंचित)- या मतदारसंघात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. - पोलीस सेवेतून सेवानिवृत्ती घेऊन राजकारणात प्रवेश.- एमआयएमचा उमेदवार नसल्याने वंचिंत आघाडीला फायदा होण्याची शक्यता.

निवृत्ती बनसोडे(बसपा)- या मतदार संघातील समाजाच्या मतांचा आधार. - मायावती यांना मानणारा मतदार हीच निवृत्ती बनसोडे यांची जमेची बाजू. - सर्वसामान्यांच्या कामाविषयी तळमळ.- प्राध्यापक असल्याने शिक्षकांच्या मतांचा फायदा.

2०14चे चित्रसंतोष दानवे (भाजप विजयी)  चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी काँग्रेस पराभूत)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019bhokardan-acभोकरदनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalanaजालना