शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी: मनोज जरांगे पाटील कुठे उमेदवार देणार?; मतदारसंघांची पहिली यादी समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 16:08 IST

ज्या जागा जिंकू शकतो, अशा ठिकाणी उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी ज्यांनी आपल्याला त्रास दिला, त्यांचा पराभव करू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली. 

Manoj Jarange Patil ( Marathi News ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असून काही मतदारसंघांबाबतही घोषणाही केली आहे. जिथं समीकरण जुळेल, त्या मतदारसंघांमध्ये आम्ही निवडणूक लढवू, असं मनोज जरांगे यांनी यापूर्वी जाहीर केलं होतं. त्यानुसार बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देण्याचे जरांगे यांनी निश्चित केलं आहे.

विधानसभा उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी आपल्या सहकाऱ्यांची अंतरवाली सराटी इथं बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही जागांबाबत प्राथमिक चर्चा झाली. यामध्ये आपण ज्या जागा जिंकू शकतो, अशा ठिकाणी उमेदवार देऊ आणि इतर ठिकाणी ज्यांनी आपल्याला त्रास दिला, त्यांचा पराभव करू, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली. 

ज्या जागा लढवायच्या आहेत, त्याबाबत बोलताना आपण  बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या जागांवर उमेदवार द्यायला हवेत, असं मत मनोज जरांगे यांनी मांडलं आहे. त्यामुळे या मतदारसंघांतील प्रस्थापित नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे आणखी काही सहकाऱ्यांशी चर्चा करून आज सायंकाळपर्यंत उर्वरित जागांबाबत आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

मनोज जरांगे कोणकोणत्या जागांवर निवडणूक लढवणार? 1) केज,(राखीव )(बीड जिल्हा)2) परतूर, (जालना जिल्हा)3) फुलंब्री, (छत्रपती संभाजीनगर जिल्हा)4) बीड, (बीड जिल्हा)5) हिंगोली, (हिंगोली जिल्हा)6) पाथरी,( परभणी जिल्हा)7) हदगाव, (नांदेड जिल्हा)

कोणकोणत्या मतदारसंघांत पाडण्याची मोहीम राबवणार?1) भोकरदन, (जालना जिल्हा)2) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)3) कळमनुरी, (हिंगोली जिल्हा)4) गंगखेड, (परभणी जिल्हा)5) जिंतूर, (परभणी जिल्हा)6) औसा-(लातूर जिल्हा)

कोणत्या मतदारसंघात पाठिंबा देणार?1) बदनापूर राखीव जालना जिल्हा2) पश्चिम विधानसभा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणbeed-acबीडphulambri-acफुलंब्रीhingoli-acहिंगोली