शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अटीतटीच्या लढतीत जालना जिल्ह्यातून शिवसेना झाली हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 18:44 IST

जालना जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्ष वगळता अपक्षांची रणनीती पूर्णत: फोल ठरली.

- संजय देशमुख

जालना जिल्ह्यात चार वेळेस विधानसभेत जाऊन मंत्रीपद भूषविलेल्या बलाढ्य अर्जुन खोतकर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. भाजपाने तीन जागा व राष्ट्रवादीने एक जागा कायम राखली. तर  काँग्रेसला एक जागा मिळाली.

जालना विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांनी मात केली. गोरंट्याल यांचा २५ हजाराहून अधिक मतांनी विजय झाला. सलग चार टर्म राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला घनसावंगी मतदार संघ राजेश टोपे यांनी शेवटपर्यंत चुरशीची टक्कर देऊन अवघ्या तीन हजार मतांनी कायम राखला. मतमोजणीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

भोकरदन मतदान संघात भाजपची जागा कायम राहिली असून, संतोष दानवे यांचा ३० हजाराहून अधिक मतांनी विजय झाला. तर राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे पराभूत झाले. बदनापूरमध्ये नारायण कुचे यांनीही आपला गड ताब्यात ठेवला. कुचे यांनी १ लाख ४ हजार ९७१ मते मिळविली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे परतूर येथील उमेदवार बबनराव लोणीकर यांचा विजय झाला. काँग्रेसचे सुरेशकुमार जेथलिया यांनी लोणीकरांना तगडे आव्हान दिले होते. मात्र त्यांना विजयश्री खेचता आली नाही.

ठळक मुद्दे 1जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत  भाजपने आपले तीन आमदार कायम राखले. 2कैलाश गोरंट्याल यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात संजीवनी मिळाली. राज्यमंत्री अर्जुन खोतकरांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. 3निवडणूक प्रशासनाच्या कासव गतीमुळे निकालाला लागला उशिर. 4पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा लोणीकरांसाठी ठरली मैलाचा दगड. इतर उमेदवारांनाही झाला लाभ. 5मातब्बर नेत्यांच्या सभांनी प्रचारादरम्यान ढवळून निघाला जिल्हा. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचा पाहिजे तेवढा प्रभाव पडला नाही.

असे आहेत विजयी उमेदवार भाजप1. बबनराव लोणीकर, परतूर2. संतोष दानवे, भोकरदन3. नारायण कुचे, बदनापूरकाँग्रेस1. कैलाश गोरंट्याल, जालनाराष्ट्रवादी-1. राजेश टोपे, घनसावंगी 

अपक्षांची रणनीती ठरली फोल : जालना जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्ष वगळता अपक्षांची रणनीती पूर्णत: फोल ठरली.

गोरंट्याल यांची खोतकरांवर मातसंपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जालना मतदार संघात काँग्रेसचे कैलाश गोरंट्याल यांनी खोतकरांवर मोठ्या मताधिक्याने मात केली. गत निवडणुकीत खोतकरांनी गोरंट्याल यांचा निसटता पराभव केला होता.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019JalanaजालनाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस