शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

महानुभाव पंथातील तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी जालन्यात साहित्य मेळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 1:40 PM

जालन्यात २३ आणि २४ डिसेंबर असे दोन दिवस २४ वे अ.भा. महानुभाव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जालन्यात २३ आणि २४ डिसेंबर असे दोन दिवस २४ वे अ.भा. महानुभाव साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे साहित्य संमेलन भरविण्यामागील प्रेरणा आणि गरज याविषयी संमेलनाचे संयोजक महंत प्रज्ञासागर महाराज यांच्याशी ‘लोकमत’चे संजय देशमुख यांनी केलेली बातचीत. 

प्रश्न - महानुभाव साहित्य संमेलन भरविण्यामागचा हेतू काय?- संमेलनाच्या माध्यमातून लिळाचरित्रात चक्रधर स्वामींनी जे तत्वज्ञान घालून दिले आहे. त्याचा प्रचार व प्रसार करण्यासह महानुभाव पंथाचे तत्वज्ञान काय हे सर्वांसमोर नेण्याच्या उद्देशाने जालन्यात हे संमेलन होत अहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आ. राजेश टोपे आहेत. 

प्रश्न - महानुभाव पंथाच्या इतिहासाबाद्दल काय सांगाल?- महानुभाव पंथाला मोठा  इतिहास आहे. मराठी भाषेला समृध्द करणारा पंथ म्हणून याची ओळख आहे. बोली भोषेतून तत्वज्ञान आणि अन्य विचार सांगितल्यास ते चटकन कळतात. या विचारातूनच महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांनी गोवोगाव फिरून मानवतेला प्राधान्य दिले आहे. जात-पात, धर्म, पंथ न मानता प्रत्येकाकडे सहिष्णूतेने वागले पाहिजे.  तसेच स्त्री-पुरूष समानता  आणि स्त्री शिक्षणाची गरज ही चक्रधर स्वामींनी १२ व्या शतकात ओळखली होती आणि त्यावेळी त्यांची अंमलबजावणीही केली.  त्यावेळीही त्यांना विरोध झाला होता. या विरोधाला न जुमानता त्यांनी परिवर्तनाला महत्व दिले. महदंबा या मराठीतील आद्य कवयत्रिला मार्गदर्शन करून चक्रधर स्वामींनी तिला त्या काळात लिहिते केले. त्यामुळे साहित्य जगतात महदंबेला आद्य कवयत्रीचा सन्मान दिला आहे. 

प्रश्न - आद्य कवयत्री महदंबा आणि जालन्याचे नाते काय?- जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रामसगाव हे या आद्य कवयत्रीचे मूळ गाव. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. चक्र्रधर स्वामींनी लिळाचरीत्रात सांगितलेले मर्म सूत्रपाठाच्या माध्यमातून सर्र्वांपर्यंत पोहचविण्याचे कार्य तत्कालिन पंडित व्यास यांनी केले आहे. चक्रधर स्वामींनी विदर्भातील रामटेक ते बीड आणि नंतर त्र्यंबकेश्वर ते राहेर असे पदभ्रमण केले. ते ज्या ज्या ठिकाणी थांबले ते मठ म्हणजेच तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जातात. असे एकूण १६५० तीर्थस्थळे आहेत. 

प्रश्न - महानुभाव पंथ आणि प्रपंच याविषयी काय सांगाल?महानुभाव पंथात जीव, देवता, परमेश्वर आणि प्रपंच यावर आधारित आहे. भगवान श्रीकृष्ण, दत्तात्रेय प्रभू, श्री चक्रधर स्वामी आणि गोंविंद प्रभू यांना महत्व देऊन त्यांची पूजा-अर्चा करतो. लिळाचरित्र आणि सूत्रपाठ म्हणजे या पंथाचे वेद आहेत. महानुभाव पंथ हा सर्वांना समान मानणारा पंथ आहे. स्त्री-पुरूष भेद मान्य नसून, सर्व प्राणिमात्रांसंदर्भात आस्था, कोणाविषयी निंदा-नालस्ती न करणे तसेच सहिष्णूता आणि अहिंसेलाही मोठे महत्व या पंथात आहे. चक्रधर स्वामींनी लिळाचरित्रातून जे निरूपण सांगितले आहे. त्या निरूपणांना या पंथात अनन्य साधारण महत्व आहे. इतर भक्तीलाही पंथात मोठे स्थान आहे. 

प्रश्न - साहित्य संमेलनास कोणाची उपस्थिती राहणार?- जालन्यात होऊ घातलेल्या साहित्य संमेलनात आचार्य लोणारकर बाबा, आचार्य बाबूळगावकर बाबा, आचार्य सेवलीकर बाबा, आचार्य कळमकर बाबा, तपस्वीनी आचार्य सुभद्रा आत्या, उपाख्य कुलाचार्य न्यायम बाबा, आचार्य खामणिकर बाबा, अखिल भारतीय महानुभाव  साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. पुरूषोत्तम नागपूरे, उपाख्य पुरूषोत्तम कारंजेकर बाबा यांच्यासह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपसिथती राहणार आहे. 

प्रश्न - ऐतिहासिक संदर्भासाठी काही पुस्तकप्रदर्शने असणार आहेत का?- होय, ग्रंथसंपदेची मोठी पर्वणी या काळात असणार आहे. महानुभाव पंथाने सहा हजार ५०० ग्रंथ आणि पोथी आहेत. १९२० मध्ये पुणे येथील प्राच्यविद्या भांडारकर वाचनालयाने महानुभाव पंथातील ५०० कवींची एक यादी प्रसिध्द केली होती. त्यावरून या पंथात किती दर्जेदार साहित्य आहे हे दिसून येते.  लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते, त्यावेळी तत्कालीन अधिवेशनाचे अध्यक्ष कै. बाळ गंगाधार  टिळकांनी तेथे सुरू असलेल्या महानुभाव पंथाच्या धार्मिक प्रवचनास भेट देऊन त्या संदर्भातील अग्रलेख केसरी या वृत्तपत्रात छापला होता. यावरून हा पंथ त्या काळात संपूर्ण भारतभर पसरला होता हेच दिसून येते.  अशी अनेक महत्त्वपूर्ण संदर्भ असलेली पुस्तके या ग्रंथप्रदर्शनात भेटतील. 

 ( शब्दांकन - संजय देशमुख, जालना 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकliteratureसाहित्यJalanaजालना