सहा महिन्याच्या गर्भवतीचा खून प्रकरणात सहा जणांना जन्मठेप

By दिपक ढोले  | Published: December 14, 2023 07:37 PM2023-12-14T19:37:04+5:302023-12-14T19:37:26+5:30

सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात सात साक्षीदार तपासण्यात आले.

Life imprisonment for six people in the case of murder of a six-month pregnant woman | सहा महिन्याच्या गर्भवतीचा खून प्रकरणात सहा जणांना जन्मठेप

सहा महिन्याच्या गर्भवतीचा खून प्रकरणात सहा जणांना जन्मठेप

जालना : सहा महिन्याच्या गर्भवती महिलेचा खून करणाऱ्या सहा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. निलोफर जाफर खान (२३), नसिमाबी जाफर खान (५५), आरबाज खान जाफर खान (२० सर्व रा. वलीमामू दर्गा जवळ, जालना), इस्माईल ऊर्फ शक्ती अहेमद शहा (३८), हलीमाबी उर्फ हल्लो धुमअली शहा (६०), शबाना धुमअली शहा (३० सर्व रा. काजीपुरा, जालना) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

९ ऑगस्ट २०२० रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी, त्याची गर्भवती असलेली मयत पत्नी हिना खान, तीन लहान मुले हे घराचा दरवाजा बंद करून समोरच्या खोलीत झोपले होते. यातील आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडून व घरात घुसून फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी गजाने मारले. मयत हिना खान ही गर्भवती असतांना तिच्या डोक्यात गजाने, घन, काठी व चाकूने गंभीर जखमी करून तिला घराच्या बाहेर ओढत आणले. तिला जिवे ठार मारले. या प्रकरणी फिर्यादी सय्यद माजीद सय्यद कय्युम तांबोळी यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारपक्षातर्फे आलेला साक्षीपुरावा व दोन्ही बाजूचा युक्तीवाद लक्षात घेवून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांनी गर्भवती महिलेचा खून केल्या प्रकरणी सहा आरोपींना कलम ३०२ भादवीसह १४९ मध्ये जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त अभियोक्ता ॲड. भारत के . खांडेकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मदत केली.

यांच्या साक्षी ठरल्या महत्वाच्या
सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी सय्यद माजीद सय्यद कय्युम तांबोळी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, डॉ. आर. बी. शेजुळे, तपासिक अंमलदार सपोनि. शिवाजी नागवे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.

Web Title: Life imprisonment for six people in the case of murder of a six-month pregnant woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.