बिबट्याने पाडला वासरू, कुत्र्यांचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:56 IST2019-01-29T00:56:31+5:302019-01-29T00:56:52+5:30
महादू भगवान बोडखे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडल्याची घटना रविवारी रात्री घडली.

बिबट्याने पाडला वासरू, कुत्र्यांचा फडशा
लोकमत न्यूज नेटवर्क
भारज बु : येथील शेतकरी महादू भगवान बोडखे यांच्या शेतात असलेल्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करुन फडशा पाडल्याची घटना रविवारी रात्री घडली. यामुळे शेतवस्तीवर राहणाऱ्या शेतक-यांत भीतीचे वातावरण आहे.
परिसरात यंदा कमी पाऊस झाल्याने जंगल परिसर ओसाड पडला आहे. पाणी आणि भक्षाच्या शोधार्थ वन्यप्राण्यांनी शेतवस्तीकडे येत असल्याचे शेतकरी सांगत आहे. बाळूबा भुते यांच्या शेतातील दोन कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.
वन्यप्राण्याचा जनावरांवर वाढल्या घटना वाढल्याने शेतक-यांना रात्रीचे जागरण करावे लागत आहे. डिसेंबर महिन्यात सुध्दा बिबट्याने शेतकरी समाधान बोडखे यांच्या शेतवस्तीवरील दोन वासरांचा फडशा पाडला होता.
त्यानंतर पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतक-यांमध्ये धास्ती पसरली आहे. वन विभागाने हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दखल देण्याची मागणी करण्यात आली आहे.