कायदेशीररीत्या समाजहिताचे काम करणाऱ्याला विरोध होत नाही - पेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:56 IST2021-02-21T04:56:48+5:302021-02-21T04:56:48+5:30
अंबड येथे यशवंत व्याख्यानमालेच्या वतीने शनिवारपासून ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन भास्कर पेरे यांच्या हस्ते ...

कायदेशीररीत्या समाजहिताचे काम करणाऱ्याला विरोध होत नाही - पेरे
अंबड येथे यशवंत व्याख्यानमालेच्या वतीने शनिवारपासून ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन भास्कर पेरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तहसीलदार कडवकर म्हणाले की, गावात पिण्याचे शुद्ध पाणी दिले, तर गावकऱ्यांचा आरोग्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. सरपंचांनी आरोग्य व शिक्षण या बाबींकडे लक्ष द्यावे; तसेच शासनाच्या कृषी विभागाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेऊन काम करावे. लोकसहभागातूनच गावाचा विकास होतो, असेही ते म्हणाले. सायंकाळी पत्रकार संजय आवटे यांचे व्याख्यान झाले. प्रा. दीपक राखुंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले; तर प्रा. भागवत यांनी प्रास्ताविक केले. संजय खोरे यांनी आभार मानले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.