शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

जालन्यात पावसाच्या टक्केवारीत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 00:55 IST

जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर व परिसरात गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. जालन्यात मतदानाची टक्केवारी घटली असतानाच पावसाची टक्केवारी वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे.गेल्या आठवड्यापासून जालन्यात परतीच्या पावाने धुवाधार बॅटींग केली आहे. त्यामुळे वार्षिक सरारीच्या जवळपास पाऊस पडण्याची शक्यता हवान खात्याने वर्तवली आहे. जालना जिल्ह्याची सरारासरी ही ६८८ मिलिमीटर एवढी आहे. मंगळवारी सकाळी आणि नंतर सायंकाळी पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली.या पावसाचा परिणाम जिल्ह्यातील मतदानावरही झाला आहे. मंगळवारी सायंकाळी तसेच रात्री दहा वाजेच्या सुमारास जालना शहरात धुवाधार पाऊस झाला. हा पाऊस मुंबईच्या धर्तीवर पडत होता. दुपारी चार तास उघडीप दिल्यावर सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाचे पुनरागमन झाले.जालना जिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जवळपास ६१० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. ३१ आक्टोबर पर्यंत असाच पाऊस पडणार असल्याचे वृत्त असून, असेच चित्र कायम राहिल्यास यंदाची दिवाळी ही पावसात साजरी करण्याची वेळ जालनेकरांवर येणार आहे.परतीच्या पावसामुळे रबी हंगामतील शाळू ज्वारीसह हरभरा पिकासाठी चांगला आहे. असे असतांनाच सोयाबीन तसेच अन्य पिकांची काढणी करतांना अडचणी येत आहेत. या पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होत आहे.

टॅग्स :RainपाऊसWaterपाणीDamधरणriverनदी