Lakhs of 8 lakhs including jewelery | दागिन्यांसह ८ लाखांचा मुद्देमाल लंपास
दागिन्यांसह ८ लाखांचा मुद्देमाल लंपास

जालना : घराच्या मागच्या खिडकीतून घरात प्रवेश करुन दोन कपाटात ठेवलेली सोन्या ,चांदीचे दागिने आणि रोख रक्कम , चाांदीच शिक्के आदी ७ लाख ९५ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शनिवारी रात्री शहरातील करवा नगर येथे घडली.
किशन विजयकुमार शहा यांच्या फिर्यादीवरुन बुधवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घरफोडी, दुचाकीचोरी आधीच्या घटना शहरात वाढल्याने परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण आहे.
नवीन जालना भागात चोऱ्याट्यांनी पुन्हा डोके वर काढल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.


Web Title: Lakhs of 8 lakhs including jewelery
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.