मंठा बसस्थानकात सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:29 IST2021-02-20T05:29:31+5:302021-02-20T05:29:31+5:30
मंठा : मंठा शहर हे नाशिक ते निर्मल या मुख्य राज्य रस्त्यावर असल्याने येथे दररोज लांब पल्याच्या बसेस ...

मंठा बसस्थानकात सुविधांचा अभाव
मंठा : मंठा शहर हे नाशिक ते निर्मल या मुख्य राज्य रस्त्यावर असल्याने येथे दररोज लांब पल्याच्या बसेस ये-जा करतात. परंतु, मंठा येथील बसस्थानकात सोयी-सुविधांचा अभाव असल्याने प्रवासी त्रस्त झाले. बसस्थानक परिसरात अस्वच्छता असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून येथील उपहारगृह बंद आहे.
मंठा शहर हे नाशिक ते निर्मल या राज्य रस्त्यावर वसलेले आहे. त्यामुळे शहरातील बसस्थानकात दररोज लांब पल्याच्या बसेस येतात. या बसस्थानकात मुंबई, नागपूर, हैदराबाद, नांदेड, अकोला, अमरावती, पंढरपूर, पुसद आदी ठिकाणच्या बसेस येतात. त्यातच जालना, परभणी, जिंतूर येथे जाण्यासाठीही बहुतांश जण बसनेच प्रवास करतात. त्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची संख्याही मोठी असते. परंतु, मंठा बसस्थानकात सोयी-सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. शौचालय नसल्याने प्रवासी उघाड्यावरच लुघशंकेस बसत आहे. पिण्याचे पाणी नसणे, उपहारगृह बंद असणे, आदी सोयी सुविधा नसल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहे. तसेच बसस्थानकातील लाईट सुरू नसल्याने रात्रीच्या वेळी अंधार पडतो. यामुळे चोºयांचे प्रमाणही वाढले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
अपुºया बसमुळे प्रवासी त्रस्त
गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासनाला लॉकडाऊन करावे लागले होते. लॉकडाऊनच्या काळात एसटी बसेस बंद करण्यात आल्या होत्या. आता लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. परंतु, तरीही एसटी महामंडळाकडून बहुतांश बसेस सुरू करण्यात आल्या नाही. अपुºया बसमुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
बसस्थानकाच्या इमारतीचे काम प्रगतीपथावर
मंठा येथील बसस्थानकाची जुनी इमारत मोडकळीस आली होती. ती इमारत पाडून आता नवीन सुसज्ज इमारत बांधण्यात येत आहे. सध्या या इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. यात स्वच्छता गृह, बुकस्टोल, उपहारगृह अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच ९ प्लॅटफॉर्मचे बसस्थानक उभारले गेले असून, या इमारतीचे काम पूर्ण झाले असल्याचे कंत्राटदाराने सांगितले.
-------------------------