फळांचा राजा बाजारपेठेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:27 AM2020-02-27T00:27:03+5:302020-02-27T00:28:03+5:30

उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली असून, फळांचा राजा आंबा जालना बाजारपेठेत दाखल झाला आहे

The king of fruits entered the market | फळांचा राजा बाजारपेठेत दाखल

फळांचा राजा बाजारपेठेत दाखल

Next

संजय लव्हाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली असून, फळांचा राजा आंबा जालना बाजारपेठेत दाखल झाला आहे. नवीन ज्वारी आणि हरभरा देखील बाजारात आला असून, भाव स्थिर आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू महागल्या आहेत.
कोकण तसेच पुणे, नगर येथून लालबाग, बदाम आंबा जालन्याच्या बाजारात दाखल झाला आहे. आंब्याचे दर मागील वर्षीप्रमाणेच म्हणजे दीडशे ते दोनशे रुपये प्रतिकिलो असे आहेत. नवीन ज्वारी व हरभऱ्याची आवक सुरु झाली आहे. नवीन ज्वारी दररोज दोनशे पोते तर जुनी ज्वारी दररोज दीडशे पोते आणि नवीन हरभरा दररोज दोनशे पोते व जुना हरभरा दररोज पन्नास पोते अशी आवक आहे. जुन्या ज्वारीचे भाव २७०० ते ३२०० आणि नवीन ज्वारीचे भाव २००० ते ३७०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. जुन्या हरभ-याचे भाव ३००० ते ३६०० आणि नवीन हरभ-याचे भाव ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटव असे आहेत. गव्हाची आवक दररोज दीडशे पोते इतकी असून, भाव १९०० ते २६०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
बाजरीची आवक दररोज ३०० पोते इतकी असून, २०९ रुपयांची मंदी आल्यानंतर भाव १३५० ते २००० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. तुरीची आवक दररोज पाच हजार पोते इतकी असून, भाव दीडशे रुपयांनी कमी झाले आहेत. सध्या तुरीचे दर ४६५० ते ५२०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. मक्याची आवक दररोज पंधराशे पोते इतकी असून, १०० - १५० रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर भाव १२०० ते १४५० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. सोयाबीनची आवक दररोज पाचशे पोते इतकी असून, दोनशे रुपयांची मंदी आल्यानंतर भाव ३५०० ते ३७५० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.
सोन्याचे दर ४१ हजार रुपये प्रति तोळा असे होते. चांदीचे दर ४८ हजार ५०० रुपये प्रति किलो असे आहेत. आता लग्नसराई असल्यामुळे सोने चांदीचे भाव वाढणारच आहेत. चीनमधील कोरोना व्हायरसचा परिणाम अद्यापही भारतीय बाजारपेठेवर कायम आहे. चीन बनावटीची खेळणी त्याचप्रमाणे टीव्ही, फ्रीज, कूलर, मोबाईल आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आवक कमी झाल्यामुळे त्यात तेजी आली आहे.
गत महिन्यात खाण्याच्या तेलाचे भाव वाढले होते. पण चीनमध्ये कोरोना व्हायरसचा परिणाम तेलावर होत आहे.
साखरेच्या दरात तेजी येणार
सर्व साखर कारखान्यांनी त्यांच्या साखरेची निर्यात लवकरात लवकर करावी, अन्यथा पुढील महिन्यात त्यांना घरगुती वापरातील साखर विक्री करता येणार नाही, अशी तंबी सरकारने दिली आहे. त्यामुळे कारखानदारांना साखर निर्यात करण्याशिवाय पर्याय नाही. निर्यात केल्यामुळे साखरेच्या दरात निश्चितच तेजी येणार आहे. सध्या साखरेचे दर ३४०० ते ३६०० रुपये प्रति क्विंटल असे आहेत.

Web Title: The king of fruits entered the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.