भांडण सोडण्यासाठी गेलेल्यावर खंजीरने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:14 IST2019-06-10T00:13:49+5:302019-06-10T00:14:29+5:30
भांडण सोडण्यासाठी गेलेल्यावर खंजीरने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास जालना शहरातील मोदीखाना येथे घडली.

भांडण सोडण्यासाठी गेलेल्यावर खंजीरने हल्ला
जालना : भांडण सोडण्यासाठी गेलेल्यावर खंजीरने हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास जालना शहरातील मोदीखाना येथे घडली. याप्रकरणी जयदत्त शिवाजी काळे (२६, रा. मोदीखाना) यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोदीखाना येथे गणेश वाघमारे व दीपक भगत यांच्यात प्रेम प्रकरणावरुन भांडण सुरु होते. तक्रारदारांचा चुलत भाऊ ओंमकार काळे हा भांडण सोडण्यासाठी गेला असता, त्याला दीपक भगत याने खंजीर खुपसला. यात ओंकार हा गंभीर जखमी झाला आहे.
ओमकार हा गणेश वाघमारे याचा मित्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक कोळासे, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी जयदत्त शिवाजी काळे यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गणेश वाघमारे व दीपक भगत हे दोघेही फरार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक
कोळासे यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोळासे करीत आहेत.