केदारेश्वर महाराज यात्रोत्सव रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 00:13 IST2020-03-23T00:12:49+5:302020-03-23T00:13:27+5:30

श्री. केदारेश्वर महाराज यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे

Kedarshwar Maharaj Yatra festival canceled | केदारेश्वर महाराज यात्रोत्सव रद्द

केदारेश्वर महाराज यात्रोत्सव रद्द

केदारखेडा : येथील श्री. केदारेश्वर महाराज यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. याबाबत येथे शनिवारी सकाळी ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली.
यावेळी एकमुखाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २६ मार्च रोजी येथे होणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आला. शेकडो वर्षांपासून येथील केदारेश्वर महाराजांचा यात्रोत्सव सुरू आहे. यंदा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनी केवळ नवस पूर्ण करण्याचा निर्णय घेऊन भवानी मातेची स्वारी थेट मंदिरावर नेऊन आरती करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. या प्रसंगी पंडित जाधव, काकासाहेब जाधव, शरद जाधव, संदीप शेळके, काकासाहेब मुरकुटे, विठ्ठल पेरे, अशोक शर्मा, भाऊसाहेब जाधव, संचित जाधव, ईश्वर जाधव, अशोक मुरकुटे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Kedarshwar Maharaj Yatra festival canceled