आरक्षणासाठी केदारखेडा ते भोकरदन ट्रॅक्टर मोर्चा
By दिपक ढोले | Updated: September 20, 2023 16:31 IST2023-09-20T16:29:24+5:302023-09-20T16:31:57+5:30
जवळपास ६०० हून अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

आरक्षणासाठी केदारखेडा ते भोकरदन ट्रॅक्टर मोर्चा
दीपक ढोले
भोकरदन, केदारखेडा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी केदारखेडा ते भोकरदनपर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यात जवळपास ६०० हून अधिक ट्रॅक्टर सहभागी झाले होते. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
या मोर्चाला केदारखेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन करून सुरुवात झाली. भोकरदन येथील तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला. शासनाने मराठा समाजाची भावना लक्षात घेऊन आरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे यांचे साखळी उपोषण सुरू आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी केदारखेडा येथील सकल मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केलेले आहे. त्याला ११ दिवस पूर्ण झाले आहे. त्यात आता ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे.
या मोर्चात केदारखेड्यासह, जवखेडा ठोंबरे, गव्हाण संगमेश्वर, बानेगाव, चिंचोली, देऊळगाव ताड, वालसा खालसा, वालसा डावरगाव, बरंजळा लोंखडे, बरंजळा साबळे, नळणी खुर्द, सोयगाव देवी, मेरखेडा, बोरगाव तारू, टाकळी बाजड, नळणी बु, कोपार्डा, पळसखेडा खरात, तोंडोळी,लिंगेवाडी, थिगळखेडा, जवखेडा पवार, जानेफळ दाभाडी, सिरसगाव इंगळे, खडकी आदी गावातील समाजबांधव उपस्थित होते.