कररे आता व्हिडिओ....पोलिसांच्याच आले अंगलट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:22 IST2021-05-28T04:22:54+5:302021-05-28T04:22:54+5:30

पोलीस आल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर तसेच कदीम ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन आणि अन्य पोलीस तेथे होते. यावेळी ...

Karre, now the video .... The police came | कररे आता व्हिडिओ....पोलिसांच्याच आले अंगलट

कररे आता व्हिडिओ....पोलिसांच्याच आले अंगलट

पोलीस आल्यानंतर पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर तसेच कदीम ठाण्याचे निरीक्षक प्रशांत महाजन आणि अन्य पोलीस तेथे होते. यावेळी ते समाजाबद्दल चुकीचे विधान करून समाजाबद्दल अपशब्द काढत होते. त्याचे चित्रीकरण व्हिडिओत मारहाण होत असलेल्या शिवराज नारियलवाले यांनी केले. हे चित्रीकरण का करतोस, असे म्हणत खिरडकर, महाजन आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी आपल्याला एका खोलीत नेले आणि तेथे अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची प्रतिक्रिया नारियलवाले यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

९ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान ही मारहाण झाली. या मारहाणीचा व्हिडिओ गुरुवारी सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, दिवसभर शहरासह संपूर्ण राज्यात या व्हिडिओवरच उलटसुलट प्रतिक्रिया येत होत्या. दरम्यान, नारियलवाले तसेच सुनील खरे यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यात खिरडकर आणि महाजन यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली. तसेच त्यांच्याकडे असलेले पुरावेही दिल्याचे नारियलवाले यांनी सांगितले.

वीस दिवस दवाखान्यात

ही अमानुष मारहाण झाल्याने आपण मानसिकरीत्या हतबल झालो होतो. सर्व अंग सोलून निघाल्याने मला तीन ते चार दिवस चालताही आले नाही. एवढी अमानुष मारहाण केल्यावर एखाद्या जनावरासारखे मला पायाला धरून फरपटत गाडीत टाकले. तसेच या मारहाणीची वाच्यता कुठे केल्यास आणखी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी दिल्याचेही नारियलवाले यांनी सांगितले.

-------------------------------------

भीमशक्ती मोर्चा काढणार

भीमशक्ती संघटनेने या पोलिसांच्या मारहाणीचा निषेध नोंदविला. तसेच या गंभीर मारहाण प्रकरणातील सहभागी सुधीर खिरडकर आणि प्रशांत महाजन या पेालीस अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. तसेच दहा जूनपर्यंत या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करून कलम ३०७ अन्वये गुन्हे अधिकाऱ्यांवर दाखल करण्याची मागणी केली. तसे न केल्यास मोर्चा काढण्याचा इशारा गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी प्रमोद रत्पपारखे, सुधाकर निकाळजे, रोहिदास गंगा तिवरे, किशोर बोर्डे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Karre, now the video .... The police came

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.