आग्या मोहळापासून वाचण्यासाठी शेततळ्यात उडी मारली, पण माश्यांनी वरच येऊ दिले नाही

By दिपक ढोले  | Updated: March 2, 2023 18:51 IST2023-03-02T18:51:34+5:302023-03-02T18:51:50+5:30

शेततळ्यात उडी मारली. परंतु, आग्या मोहळाच्या माश्या त्यांना पाण्याबाहेर येऊ देत नव्हत्या.

Jumping into the farm lake to escape the from honey bees risked his life; Died by drowning in Jalana | आग्या मोहळापासून वाचण्यासाठी शेततळ्यात उडी मारली, पण माश्यांनी वरच येऊ दिले नाही

आग्या मोहळापासून वाचण्यासाठी शेततळ्यात उडी मारली, पण माश्यांनी वरच येऊ दिले नाही

जालना : आग्या मोहळापासून वाचण्यासाठी शेततळ्यात उडी मारलेल्या ४० वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंठा तालुक्यातील जयपूर येथे बुधवारी सायंकाळी घडली. राजाभाऊ श्रीरंग कांबळे (वय ४२, रा. देवळा, ता. परतूर) असे मयताचे नाव आहे, अशी माहिती सेवली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नित्यानंद उबाळे यांनी दिली.

राजाभाऊ कांबळे हे बुधवारी सायंकाळी जयपूर शिवारातील शेतात एका शेतात लाकूड तोडण्यासाठी गेले होते. बाभुळीचे झाड तोडल्यानंतर त्यांच्या मागे आग्या मोहळ लागले. मोहळापासून बचावासाठी त्यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. शेततळ्यात उडी मारली. परंतु, आग्या मोहळाच्या माश्या त्यांना पाण्याबाहेर येऊ देत नव्हत्या. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही बाब ग्रामस्थांना समजली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन याची माहिती सेवली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर पाण्याबाहेर काढला. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी सेवली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Jumping into the farm lake to escape the from honey bees risked his life; Died by drowning in Jalana