रेल्वेखाली उडी; बाप-लेकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:14 IST2019-09-28T23:13:49+5:302019-09-28T23:14:20+5:30
मोतीबाग येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या खालील बाजूस असलेल्या पोल क्र. १७२/४ नजीक बाप-लेकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

रेल्वेखाली उडी; बाप-लेकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील मोतीबाग येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या खालील बाजूस असलेल्या पोल क्र. १७२/४ नजीक बाप-लेकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.
ही घटना शनिवारी सकाळी घडली. मयत व्यक्तीचे अंदाजे वय ४० असून, मुलाचे वय अंदाजे ६ वर्षे आहे. घटनेनंतर चंदनझिा पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत दोघांची सायंकाळी उशिरापर्यंत ओळख पटू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेचा अधिक तपास एएसआय घोडे हे करीत आहेत.