शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

बुलढाण्यातून जीप चोरून नेवासा, नळदुर्ग येथील सराफा दुकाने लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 19:15 IST

जीपसह चार लाखाचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देचौघे एडीएसच्या जाळ्यातपाठलाग करून पकडलेसराफाचे दुकान हेच टार्गेट

जालना : बुलडाणा जिल्ह्यातील राहेरी येथे चोरलेल्या जीपचा वापर करून चोरट्यांनी नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील सराफा दुकान लुटले. तसेच नेवासा येथील सराफा, किराणा दुकान लुटले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री जालना शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना एडीएसच्या पथकाने जेरबंद केले. या कारवाईत जीपासह ४ लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

जालना येथील एडीएसचे (दरोडा प्रतिबंधक पथक) पोनि यशवंत जाधव व त्यांचे सहकारी शुक्रवारी रात्री शहरात गस्त घालत होते. मस्तगड येथून गुरूग्लोबल स्कुलकडे जात असताना रमेश मुळे यांच्या शेतातून सहा ते सात जण हातात धारदार शस्त्र घेऊन जाताना दिसले. पोलिसांची चाहूल लागताच त्या सात जणांनी जवळच उभा असलेल्या जीपमध्ये धाव घेऊन पळ काढला. त्यावेळी पथकाने जीपचा पाठलाग करून मंठा ते अंबड चौफुली मार्गावर जीपसमोर वाहन लावून जीपमधील चौघांना ताब्यात घेतले. जीपची तपासणी केली असता आतमध्ये एक तलवार, कुलूप तोडण्याची लोखंडी कटर, दोरी व इतर साहित्य आढळून आले. 

पोलिसांनी किशोरसिंग उर्फ टकल्या रामसिंग टाक, दियासिंग बरीहमसिंग कलाणी (दोघे रा. जालना), गजानन सोपान शिंगाडे (रा. पाचनवडगाव ता. जि. जालना), अनिल गोरखनाथ वलेकर (रा. काजळा ता. बदनापूर जि. जालना) यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून जीपसह ४ लाख १५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एडीएसचे पोनि. यशवंत जाधव, कदीम ठाण्याचे पोनि. देविदास शेळके, पोहेकॉ. ज्ञानदेव नांगरे, पोहेकॉ नंदू खंदारे, पोना. किरण चव्हाण, पोकॉ. सचिन आर्य, पोकॉ. संदीप चिंचोले, पोकॉ. विजय निकाळजे, विजय निकाळजे, पोना गणेश जाधव, कृष्णा चव्हाण, रमेश काळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणी पोहेकॉ नागरे यांच्या तक्रारीवरून कदीम पोलीस ठाण्यात वरील चौघाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि सोनवळे हे करीत आहेत.

राहेरीतील चोरलेल्या जीपचा वापर या चोरट्यांनी राहेरी (जि. बुलडाणा) येथून काही दिवसांपूर्वी एक जीप चोरली होती. या जीपचा वापर करून नेवासा येथील सोनाराचे दुकान व किराणा दुकान फोडले. औरंगाबाद पासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील महाराष्ट्र बँकेचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच नळदुर्ग (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) येथील सराफा दुकान फोडल्याची कबुली या चोरट्यांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तिघांनी काढला पळएडीएस व कदीम पोलिसांनी जीप अडविल्यानंतर जीपमधील सातपैकी चौघांना ताब्यात घेण्यात आले. तर अंधाराचा फायदा घेत तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला. या तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

सराफाचे दुकान हेच टार्गेटपोलिसांनी जेरबंद केलेले आरोपी अधिक प्रमाणात सोनाराची दुकाने टार्गेट करून चोरी करीत असल्याचे समोर आले आहे. या चोरट्यांनी आजवर अनेक सराफाची दुकाने फोडली असून, चोºयांसह इतर अनेक गुन्हेही जालन्यासह औरंगाबाद, बुलडाणा, नगर, उसमानाबाद जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीArrestअटकJalanaजालना