रविवारी जालना विकास परिषदेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:35 IST2018-02-16T00:35:18+5:302018-02-16T00:35:24+5:30

मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे जालना जिल्ह्याचा विकासात्मक प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी रविवारी जालना जिल्हा विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Jalna Vikas Parishad on Sunday | रविवारी जालना विकास परिषदेचे आयोजन

रविवारी जालना विकास परिषदेचे आयोजन

जालना : मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे जालना जिल्ह्याचा विकासात्मक प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी रविवारी जालना जिल्हा विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.
मराठवाडा विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या परिषदेस भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी आ. सुरेश जेथलिया, जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, भाजप जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावेळी मराठवाडा शेती सहाय्यक मंडळाचे विश्वस्त विजयअण्णा बोराडे, उद्योजक सुनील रायठठ्ठा, मराठवाडा विकास मंचाचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत.
नागरिकांनी परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. शंकरराव राख, गणेशलाल चौधरी, सचिव अ‍ॅड. विनायक चिटणीस, अ‍ॅड. डी.के. कुलकर्णी यांनी केले आहे.
-----------

Web Title: Jalna Vikas Parishad on Sunday