जालन्यात ५१ फूट रावणाचे दहन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:53 AM2019-10-06T00:53:06+5:302019-10-06T00:53:32+5:30

दसरा महोत्सव समितीच्यावतीने दसऱ्याच्या दिवशी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी ६ वाजता जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.

In Jalna, there will be 2 feet of Ravana combustion | जालन्यात ५१ फूट रावणाचे दहन होणार

जालन्यात ५१ फूट रावणाचे दहन होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दसरा महोत्सव समितीच्यावतीने दसऱ्याच्या दिवशी रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही हा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी ६ वाजता जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
या कार्यक्रमाची तयारी जोरदार सुरु असून दसरा महोत्सव समितीच्या वतीने यानिमित्त आकर्षक आतषबाजी करण्यात येणार आहे. ५१ फूट रावणाच्या मूर्तीची तयारी सुरु असून, या कार्यक्रमास राजकीय तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती संयोजक विनित सहानी तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
यावेळी शंभर मुलींच्या लेझीम पथकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यात सीटीएमके, सुरेखा प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमास जालनेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे. यावेळी नयनरम्य आतबाजीची परंपरा याही वर्षी राहणार आहे.

Web Title: In Jalna, there will be 2 feet of Ravana combustion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.