चौकट
आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा : गोरंट्याल
यावेळी पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात आ. कैलास गोरंट्याल यांनी धडाकेबाज उद्घाटनाची जंत्री वाजविली. ही सर्व कामे पूर्ण झाल्यावर शहराचा चेहरामोहरा निश्चित बदलेल, असा दावा त्यांनी केला. शहर विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून जालना पालिकेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध विकासकामे केल्यानेच जनतेने आपल्यावर विश्वास दाखविल्याचे ते म्हणाले. भविष्यात पित्ती पेट्रोलपंप ते अंबड चौफुली या मार्गासाठी लवकरच मंजुरी घेऊन त्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आजचा दिवस हा जालन्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
चौकट -
महापालिका झाल्यास आणखी फायदा : टोपे
जालना शहराचा विकास करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून तो केला पाहिजे. असे सांगून जालना पालिकेचे रूपांतर हे महापालिकेत करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. परभणी, चंद्रपूर सोबतच जालना पालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले असते; परंतु त्यावेळी लोकसंख्या कमी पडली होती. आता ती लोकसंख्या निकषात बसण्याएवढी झाली असेल. त्यामुळे जालना पालिकेचे रूपांतर महापालिकेत करण्यासाठीचा प्रस्ताव दिल्यास आपण पालकमंत्री म्हणून त्यासाठी मंत्रिमंडळात विशेष पुढकार घेऊ, असे ते म्हणाले. तसेच यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडूनही अधिकचा विकास निधी मिळण्यास मदत होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.