शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

जालना अनुदान घोटाळा: आणखी ४ तलाठी जेरबंद, अटक आरोपींची एकूण संख्या २४ वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 14:52 IST

अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी शासनाने कोटींचा निधी मंजूर केला होता.

जालना : जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात २५ कोटींच्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आणखी ४ तलाठ्यांना शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने या चौघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणातील अटक आरोपींची एकूण संख्या आता २४ झाली आहे.

अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी शासनाने कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र, महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ज्यांच्या नावे शेती नाही, अशा बोगस व्यक्तींची नावे यादीत घुसवली. या बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करून ती परस्पर काढून घेण्यात आली. या महाघोटाळ्याची तक्रार प्राप्त होताच तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली होती.

२४० गावांत २५ कोटींचा डल्लाचौकशी समितीच्या अहवालानुसार, २४० गावांमध्ये तब्बल २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी २२ तलाठी, ७ महसूल कर्मचारी अशा एकूण २९ जणांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घोटाळ्यात आतापर्यंत २४ जण गजाआड झाले आहेत. मात्र, अद्यापही काही कर्मचारी आणि यात मध्यस्थी करणारे एजंट फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले असून, लवकरच आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

हायकोर्टापर्यंत धाव, पण पदरी निराशागुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते. त्यांनी अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालय ते उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर केल्याने सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले. अटक टाळण्यासाठी आरोपींनी मोबाईलचा वापर बंद केला होता आणि सोशल मीडियापासूनही ते लांब राहत होते.

'या' आरोपींना ठोकल्या बेड्याआर्थिक गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे. यात विनोद जयजयराम ठाकरे (वय ४३, रा. जालना), कृष्णा दत्ता मुजगुले (वय ३५, रा. ढालसखेडा), गणेश ऋषींदर मिसाळ (वय ३४, रा. दुधनाकाळेगाव), दिगंबर गंगाराम कुरेवाड (वय ५५, रा. जालना) या आरोपींचा समावेश आहे. या सर्वांना अंबड न्यायालयात हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna Grant Scam: Four More Talathi Arrested, Total Reaches 24

Web Summary : Four more Talathi officers were arrested in the ₹25 crore Jalna grant scam. A total of 24 individuals have now been apprehended, with investigations ongoing to capture remaining suspects involved in the fraud related to compensation for natural disaster losses.
टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी