जालन्यात अलोट गर्दीने पालखीचा उत्साह व्दिगुणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 00:11 IST2019-07-13T00:11:11+5:302019-07-13T00:11:41+5:30

जालना शहराचे आराध्य दैवत असलेल्या आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी मिरणूक सोहळ्यात भाविकांच्या अलोट गर्दीने उत्साह व्दिगुणित झाला होता.

Jalna enthusiastically excited by the crowd | जालन्यात अलोट गर्दीने पालखीचा उत्साह व्दिगुणित

जालन्यात अलोट गर्दीने पालखीचा उत्साह व्दिगुणित

ठळक मुद्देभज गोविंदम भज गोपालचा निनाद : चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी डोळ्याची पारणे फेडली, चांगल्या पावसासाठी भाविकांचे साकडे

जालना : जालना शहराचे आराध्य दैवत असलेल्या आनंदी स्वामी महाराजांच्या पालखी मिरणूक सोहळ्यात भाविकांच्या अलोट गर्दीने उत्साह व्दिगुणित झाला होता. भज गोविंदम भज गोपाल... स्वामी आनंदी दिनदयाळ निनादाने वातावरण भक्तीमय झाले होते. पालखी सोबत असलेल्या ढोल पथकाचा लयबध्द ताल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. तर मल्लखांबावरील युवकांच्या एकापेक्षा एक सरस प्रात्यक्षिकांनी उपस्थित भाविकांच्या डोळ्याची पारणे फेडली. चांगला पाऊस पडू दे असे साकडे भाविकांनी आनंदी स्वामींचा जयघोष केल्याने शुक्रवारी शहरात उत्साही वातावरण होते.
जालना शहरात आषाढी एकादशी निमित्त सकाळपासून उत्साही वातावरण होते. प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतांना दिसून आला. आनंदी स्वामी महाराजांची पालखी ज्या मार्गावरून जात होती. त्यापूर्वी त्या परिसरात सडा-रांगोळ्यांनी रस्ते सजवले होते. विविध संस्था, दानशूर व्यक्तींनी पालखीत सहभागी होणाºया वारकऱ्यांना फराळ आणि चहापानची व्यवस्था केली होती. भजीन मंडळाच्या टाळमृदुंग आणि विविध प्रकारच्या भजनांनी वातावरण भक्तीमय झाले होते. पावलीच्या तालांवर वारकरी मग्न होते. या पालखी मिरणुकीत आनंदी स्वामी ढोल पथक, गोविंद गर्जना ढोल पथकांमधील युवक-युवतींनी जल्लोषपूर्ण सहभाग नोंदवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
महिलांनी फुगडी खेळून भक्तीरंगात रमरमाण झाल्याचे चित्र दिसून आले. आनंदी स्वामी महाराजांची पालखी सकाळी साडेआठ वाजता मंदिरा बाहेर पडल्यावर औक्षण करण्यासाठी महिलांनी गर्दी केली. तसेच समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी महिला व पुरूषांनी लांबच-लांब रांगा लावल्या होत्या.
आषाढीनिमित्त नवीन जालन्यातही थाडेश्वर भजनी मंडळाची भव्य मिरणूक
थाडेश्वर भजनी मंडळाच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी एकादशीनिमित्त कावडपूरा भागातून हुबेहूब विठ्ठल-रूक्मिणींचे रूप धारण केलेल्या युवक-युवतींवर सर्वांच्या नजरा खिळून होत्या.
लेझीम पथक तसेच भजनी मंडळाच्या सहभागाने वातावरण भक्तीमय झाले होते. या मिरवणुकीमध्ये अबालवृद्धांनी देखील उत्साहाने सहभाग घेतला होता. यावेळी परिसरात फराळाचे वाटप करण्यात आले.

Web Title: Jalna enthusiastically excited by the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.