Jalna district receives 42 mm rainfall in 24 hours; note of heavy rainfall in the 6 circle | जालना जिल्ह्यात २४ तासात ४२ मिमी पाऊस; ६ मंडळात अतिवृष्टीची नोंद
जालना जिल्ह्यात २४ तासात ४२ मिमी पाऊस; ६ मंडळात अतिवृष्टीची नोंद

जालना : जालना जिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजन्यपूर्वीच्या २४ तासात ४२.५५ मिमी पावसाची नोंद झाली. परतूर तालुक्यात सर्वाधिक ८४ मिमी तर बदनापूर तालुक्यात ५९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, परतूर तालुक्यातील सतोना महसूल मंडळात तब्बल १७३ मिमी पाऊस झाला आहे. 

चालू वर्षात प्रथमच मागील २४ तासात जालना जिल्ह्यात ४२.५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी झालेल्या ६ महसूल मंडळात परतूर तालुक्यातील परतूर ८०मिमी, सतोना १७३ मिमी, श्रीष्टी मंडळात ७८ मिमी पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातील हसनाबाद महसूल मंडळात १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. बदनापूर तालुक्यातील दाभाडी महसूल मंडळात ११५ मिमी तर जालना तालुक्यातील वाग्रुळ जहागीर मंडळात ६५ मिमी पावसाची नोंद झाली.

तालुकानिहाय पाऊस पाहता जालना तालुक्यात ३३.३८ मिमी, बदनापूर ५९.८० मिमी, भोकरदन ४९.८८ मिमी, जाफराबाद २१.४० मिमी, परतूर ८४.१० मिमी, मंठा ३२.७५ मिमी, अंबड २८.२९ मिमी तर घनसावंगी तालुक्यात ३०.२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


Web Title: Jalna district receives 42 mm rainfall in 24 hours; note of heavy rainfall in the 6 circle
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.