शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जालना एमआयडीसी हादरली! रॉडच्या हल्ल्यात सुपरवायझरवरचे पाय फ्रॅक्चर; पिस्तूल लावून धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 20:07 IST

पोलिसांच्या सायरनमुळे वाचला जीव! जालन्यात सुरक्षारक्षकाचे पाय तोडले; गावठी पिस्तूल दाखवून आरोपी फरार

जालना: "येथील एमआयडीसीमध्ये पुन्हा कामाला आला तर तुला गोळी घालून ठार मारीन," अशी धमकी देत पाच जणांच्या टोळीने एका सुपरवायझरवर लोखंडी रॉड आणि लाकडी काठीने भीषण हल्ला केला. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत शालिक मुरलीधर वाघ (४०) हे गंभीर जखमी झाले असून त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. पोलिसांच्या गाडीचा सायरन वाजल्याने आरोपींनी पळ काढला, अन्यथा मोठी अघटित घटना घडली असती.

गाडीत झोपलेले असतानाच खेचले बाहेरशालिक वाघ हे एमआयडीसीतील एका कंपनीत सुरक्षारक्षक आणि सुपरवायझर म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास ते उद्योग केंद्राजवळ आपल्या गाडीत झोपलेले होते. यावेळी पाच जणांनी अचानक येऊन त्यांना गाडीतून ओढले आणि लोखंडी रॉडने त्यांच्या पायावर प्रहार करण्यास सुरुवात केली.

पिस्तूल लावून दिली धमकीहल्ल्यादरम्यान एका आरोपीने वाघ यांच्या पाठीला गावठी पिस्तूल लावून, "तू एमआयडीसीत कामाला यायचे नाही, आला तर गोळी घालीन," अशी धमकी दिली. या हल्ल्यात वाघ यांच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने, त्याच वेळी चंदनझिरा पोलिसांच्या गस्ती पथकाच्या गाडीचा आवाज आल्याने आरोपींनी कारमध्ये बसून तिथून पळ काढला.

तीन आरोपी निष्पन्न, तपास सुरूचंदनझिरा पोलिसांनी जखमी वाघ यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात तीन आरोपींची ओळख पटली असून दोन अनोळखी इसमांचा शोध सुरू आहे. चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna MIDC Shaken: Supervisor Attacked, Pistol Threat Issued

Web Summary : In Jalna MIDC, a supervisor was brutally attacked with rods and threatened at gunpoint by five men. The victim sustained severe injuries, including fractured legs. Police are investigating; three suspects identified.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना