शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रक्ताची नाती रक्ताळली! जागेच्या वादातून भावानेच भावाचा केला खून; पुतण्यावरही हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:51 IST

Jalna Crime: मंठा तालुक्यातील खळबळजनक घटना, आठ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

- शेख अझहर

वाटूर (जि. जालना): घराच्या जागेच्या बांधकामावरून निर्माण झालेल्या वादातून एका भावाने दुसऱ्या भावावर चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केल्याची हृदयद्रावक घटना मंठा तालुक्यातील गुळखंड तांडा येथे बुधवारी सकाळी घडली. या हल्ल्यात भाऊसाहेब रावसाहेब राठोड (वय ५५) यांचा मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा नवनाथ राठोड हा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

असा घडला थरारमिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब राठोड आणि संशयित आरोपी साईनाथ राठोड यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्लॉटच्या जागेवरून वाद सुरू होता. बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास याच कारणावरून पुन्हा शाब्दिक चकमक झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत होताच, साईनाथ आणि त्याच्या इतर कुटुंबीयांनी गैरकायद्याची मंडळी जमवून भाऊसाहेब यांच्यावर हल्ला चढवला. "तुला प्लॉट पाहिजे का? आता तुला प्लॉटच देतो," असे म्हणत साईनाथने भाऊसाहेब यांच्या पोटात चाकू खुपसला.

पुतण्यावरही केला वारवडील आणि काकांचे भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेला नवनाथ राठोड याच्यावरही आरोपींनी हल्ला केला. त्याच्या पाठीवर आणि मांडीवर चाकूचे खोल वार करण्यात आले. दोघांनाही रक्ताच्या थारोळ्यात सोडून आरोपी पसार झाले. उपचारासाठी जालना येथे नेत असताना भाऊसाहेब यांची प्राणज्योत मालवली. जखमी नवनाथवर जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

८ जणांवर गुन्हा दाखलयाप्रकरणी फिर्यादी अलका नवनाथ राठोड यांच्या तक्रारीवरून परतूर पोलीस ठाण्यात रावसाहेब राठोड, साईनाथ राठोड, संतोष राठोड यांच्यासह एकूण ८ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १०९, १२५ सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Land dispute turns deadly: Brother kills brother, nephew injured.

Web Summary : A land dispute in Gulkhund Tanda turned fatal when one brother fatally stabbed another. The victim's son was also seriously injured while trying to intervene. Police have registered a case against eight individuals and launched a search operation.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना