जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची मुंबईत बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 14:33 IST2018-04-16T14:33:12+5:302018-04-16T14:33:12+5:30

जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची मुंबई शहरचे जिल्हाधिकारी म्हणून राज्यशासनाने बदली केली आहे. त्यांच्या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती झाली नाही. 

Jalan's Collector Shivaji Jondhale was transferred to Mumbai | जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची मुंबईत बदली

जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची मुंबईत बदली

जालना : जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची मुंबई शहरचे जिल्हाधिकारी म्हणून राज्यशासनाने बदली केली आहे. त्यांच्या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती झाली नाही. 

जोंधळे यांनी जवळपास दोन वर्षांपूर्वी जालना जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. पीकविमा भरण्याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. याचा परिणाम म्हणून पीकविमा योजनेत राष्टीय पातळीवर जालना जिल्हा प्रथम आला. या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जोंधळे यांना गौरविण्यात आले होते. ड्रायपोर्ट, समृद्धी महामार्ग, शेगाव-पंढरपूर पालखी मार्ग आदी प्रकल्पांसाठीच्या भूसंपादनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

Web Title: Jalan's Collector Shivaji Jondhale was transferred to Mumbai