जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शाळेच्या छतावरून तेरा वर्षीय विद्यार्थिनीने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आरोही दिपक बिटलान असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षकांवर आरोप केले आहेत.
ही विद्यार्थीनी आठवी इयत्तेत शिकत होती. शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून तिने उडी घेऊन आत्महत्या केली. जालना जिल्ह्यातील मस्तगड या गावात तिचे घर आहे. आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सांगलीतील विद्यार्थ्याची दिल्लीत आत्महत्या
सांगलीच्या खानापूर तालुक्यातील ढवलश्वर गावचा रहिवासी असलेल्या शौर्य प्रदीप पाटील (१६) या १० वीच्या विद्यार्थ्याने दिल्लीत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिल्लीच्या राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने दिल्ली आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. शौर्यने त्याच्या शाळेतील शिक्षकांनी केलेल्या मानसिक छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
सुसाइड नोटमध्ये गंभीर आरोप
शौर्यच्या मृत्यूनंतर दिल्लीमध्ये त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कॅन्डल मार्च काढले जात असून, शाळा प्रशासनाविरुद्ध तीव्र विरोध प्रदर्शन सुरू आहे. मंगळवारी ही हृदयद्रावक घटना घडली. पोलीस तपासणीत शौर्यच्या बॅगेत दीड पानाची सुसाइड नोट सापडली, जी या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. सुसाइड नोटमध्ये शौर्यने स्पष्ट लिहिले की, "स्कूल वालों ने इतना बोला कि मुझे यह करना पड़ा... स्कूल की टीचर है ही ऐसी, क्या बोलूं…" त्याने थेट शाळेच्या मुख्याध्यापिका आणि तीन शिक्षिकांवर मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
Web Summary : A 13-year-old girl in Jalna tragically ended her life by jumping from a school roof. Parents allege teacher harassment as the cause. Separately, a student from Sangli committed suicide in Delhi, citing school-related mental harassment in a suicide note, sparking protests.
Web Summary : जालना में एक 13 वर्षीय लड़की ने स्कूल की छत से कूदकर आत्महत्या कर ली। परिजनों ने शिक्षक उत्पीड़न का आरोप लगाया है। अलग से, सांगली के एक छात्र ने दिल्ली में आत्महत्या की, सुसाइड नोट में स्कूल से संबंधित मानसिक उत्पीड़न का हवाला दिया, जिससे विरोध प्रदर्शन शुरू हो गया।