शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

Jalana: ५०० ब्रास वाळूची चोरी, गोंदीत २२ वाळू माफियांवर गुन्हे; आरोपित तडीपारांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:26 IST

गोंदीच्या सिद्धेश्वर पॉईंट येथील गोदावरी नदीपात्रातून २५ लाख रुपयांच्या ५०० ब्रास वाळूचा अवैध उपसा

- पवन पवारवडीगोद्री/गोंदी ( जालना) : अंबड तालुक्यातील गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईंट गोदावरी नदीपात्रातून अवैध रित्या २५ लाख रुपये किमतीचा ५०० ब्रास  वाळू उपसा व वाहतूक केल्या प्रकरणी गोंदी येथील २२ वाळू माफियांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई तहसिलदार विजय चव्हाण यांच्या आदेशाने महसूल विभागाने गुरुवारी रात्री उशीरा केली आहे. आरोपींमध्ये दोन तडीपार वाळू माफियांचा ही समावेश आहे.

गोंदी येथील सिद्धेश्वर मंदिर परिसराततील गोदावरी नदी पात्राची अंबड तहसील गौण खनिज प्रतिबंधक पथकाने पाहणी केली. या दरम्यान त्या ठिकाणी अवैधरित्या साठा केलेले वाळूचे तीन ढिगारे आढळून आले अंदाजे ४० ते ५० ब्रास साठा हा आढळून आला. तर नदीपात्रात मोठ मोठे खड्डे दिसून आले असून महसूल पथकावर पाळत ठेवून केनीच्या सहाय्याने सिद्धेश्वर मंदिर परिसरातील गोदावरीनदी पात्रातून ५०० ब्रास वाळूचा अवैधरित्या उपसा केल्याचे दिसून आले. बाजार भावाप्रमाणे २५ लाख रुपये किमतीची वाळू चोरून नेल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी महसूल पथकाने गोपनीयरित्या माहिती मिळवत गोंदी येथील २२ जणांचे नावे पुढे आले. 

या वाळू माफियांवर गुन्हे दाखल मंडळ अधिकारी कृष्णा सांडुजी एडके यांनी पंचनामा करून या प्रकरणी गोंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी वरून किशोर प्रभू खराद, विकास सुरेश खराद,मनोज सुरेश खराद, ऋषीकेश विशंभर खराद, डिगांबर रघुनाथ शिंदे, अजिनाथ दत्ता शिदे, अक्षय राजाभाऊ बाणाईत, सोपान दिनकर खराद, राहुल बळीराम खराद, बाबा अर्जुनराव कुर्लेकर, स्वप्नील तात्या निरकड, अवधूत दत्ता मिटकुल,गणेश कैलास मिरकड, महेंद्र कचरू खराद, आण्णासाहेब संजय सोळुंके, कचरू उत्तम खराद, दत्ता रघुनाथ शिंदे, महावीर उत्तम खराद, दुर्गादास आसाराम विटोरे, पंकज सखाराम सोळुंके, सुयोग मधुकर सोळुंके , गजू उर्फ गजानन गणपत सोळुंके सर्व रा. गोंदी ता. अंबड यांच्या विरुद्ध भा.न्या.स. कलम 303(2), 3(5) तह महाराष्ट्र जर्नीन महसूल अधिनीयम 1966 कलम 48(7), 48(8) सह गौण खनिज प्रतिबंधक कायदा कलम 3 व 4 प्रमाणे गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तडीपार असतानाही वाळू उपसाबीड, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तडीपार असतानाही अवैध वाळू उपसा आरोप करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात अवैध वाळू उपसा व इतर गुन्ह्यात आरोपी असलेल्या १० वाळू माफिया विरुद्ध तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी तडीपारची कारवाई करण्यात आली होती. यामध्ये सुयोग सोळुंके व गजू उर्फ गजानन गणपत सोळुंके याचाही समावेश होता. तडीपार असतानाही गोंदी येथील सिद्धेश्वर पॉईंट गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा केला म्हणून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात काही दिवसापूर्वी तडीपार असलेला सुयोग सोळुंके याने एकाला मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तडीपार असतानाही वाळू माफियाचा वावर असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :sandवाळूJalanaजालनाRevenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारी