जय शिवराय ! 'या' गावात अज्ञातांनी रातोरात बसविला शिवाजी महाराजांचा पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 11:47 IST2022-02-15T11:45:33+5:302022-02-15T11:47:11+5:30

पोलिसांनी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांना बोलवून घेवून चर्चा केली.

Jai Shivrai! In this village, a statue of Shivaji Maharaj was stbled by unknown persons overnight | जय शिवराय ! 'या' गावात अज्ञातांनी रातोरात बसविला शिवाजी महाराजांचा पुतळा

जय शिवराय ! 'या' गावात अज्ञातांनी रातोरात बसविला शिवाजी महाराजांचा पुतळा

जालना : तालुक्यातील सेवली येथे सोमवारी मध्यरात्री अज्ञात लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविला. यामुळे मंगळवारी सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

मंगळवारी पहाटेच पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकाऱ्यांना बोलवून घेवून चर्चा केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव मोरे, सेवली पोलीस ठाण्याचे सपोनि. उबाळे आदींची उपस्थिती होती. सदरील पुतळ्यासाठी जागा योग्य नसल्याने पुतळा इतर ठिकाणी बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Jai Shivrai! In this village, a statue of Shivaji Maharaj was stbled by unknown persons overnight