साहेब होत्याचं नव्हतं झालं, पावसानं सगळं नेलं...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:48+5:302021-09-03T04:30:48+5:30
घनसावंगी तालुका व परिसरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी पाहणी केली. टोपे म्हणाले, जिल्ह्यात सोमवारी झालेल्या ...

साहेब होत्याचं नव्हतं झालं, पावसानं सगळं नेलं...
घनसावंगी तालुका व परिसरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी पाहणी केली. टोपे म्हणाले, जिल्ह्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. मूग, कापूस, सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ऊस आडवा झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पिकांबरोबरच काही ठिकाणी रस्ते, पूल वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम सुरू असून, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे ते म्हणाले.
१० हजार हेक्टरला फटका
जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे १० हजार हेक्टरवरील पिकाला फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नुकसानीची माहिती मंत्रिमंडळासमोर ठेवून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, भागवत रक्ताटे, कल्याण सपाटे, उत्तम पवार, बाळासाहेब जाधव, रघुनाथ तौर, तात्यासाहेब चिमणे, नकुल भालेकर, अमरसिंह खरात, सुदामराव मुकणे, ताराचंद देवले, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार नरेंद्र देशमुख व इतरांची उपस्थिती होती.
मंगरूळ शिवारात ट्रॅक्टरद्वारे पाहणी
मंगरूळ शिवारातील नुकसानीची पालकमंत्री टोपे यांनी ट्रॅक्टरमध्ये बसून पाहणी केली. या भागातील पाझर तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. टोपे यांनी तीर्थपुरी, बानेगाव, बानेगाव फाटा, सौंदलगाव, शेवता, भोगगाव, मंगरूळ आदी ठिकाणी झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली.