विमा कंपन्या, बॅँकांना शिवसेना स्टाइलने सरळ करू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 07:32 IST2019-06-10T07:31:47+5:302019-06-10T07:32:10+5:30
उद्धव ठाकरे यांचा इशारा; ‘आम्ही शहरी बाबू असलो तरी आम्हाला शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण आहे’

विमा कंपन्या, बॅँकांना शिवसेना स्टाइलने सरळ करू
जालना : विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून विमा हप्ता म्हणून कोट्यवधी रूपये जमा करतात, परंतु नुकसान भरपाई देण्याची वेळ आल्यास हात आखडता घेतात. कारभार सुधारावा अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने सरळ करू, असा इशारा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला.
साळेगाव येथे ठाकरे यांच्या उपस्थितीत जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास दहा हजार शेतकºयांना किराणा साहित्याचे किटचे वाटप करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, ‘आम्ही शहरी बाबू असलो तरी आम्हाला शेतकºयांच्या कष्टाची जाण आहे. महाराष्ट्रात ज्या-ज्या वेळी दुष्काळ पडला व शेतकºयांवर अन्याय झाला, त्या वेळी शिवसेनेने नेहमीच खंबीर भूमिका घेतली. ही पुण्याई शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंची आहे. त्यांचा वारसा मी आणि माझे शिवसैनिक तेवढ्याच ताकदीने पुढे नेत आहोत.’
राज्यमंत्री अर्जुन खोतकर, औरंबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी खा. चंद्रकांत खैरे यांनी मार्गदर्शन केले.
‘महाप्रसाद मोहीम’
चारा छावण्यांतील शेतकºयांसाठी शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद मोहिमेचा शुभारंभ रविवारी युवासेनेचे राष्ट्रीय प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोलापुरात झाला. रविवारी पहिल्या दिवशी ७२ गाड्यांमधून अक्कलकोट, उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा या चारा छावण्यांमध्ये साहित्य पोहोचविण्यात आले आहे.