शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

‘त्या’ रस्त्यांच्या चौकशीचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2019 12:54 AM

रस्त्यांच्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी केली होती. त्यानुसार औरंगाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी चौकशीचे निर्देश दिले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या काही वर्षात कोट्यवधी रूपयांच्या रस्त्यांची कामे करण्यात आली. ही कामे करताना टेंडर मधील निकषांचे पालन केले गेले नाही. त्यामुळे आज या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या सर्व रस्त्यांच्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी केली होती. त्यानुसार औरंगाबाद येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत.जालना जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर निकष डावलून रस्ते मजबुतीकरण करण्यात आले होते.यावर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला आहे. हा खर्च होऊनही रस्त्यांच्या कामांचे तीन-तेरा वाजले आहेत. या रस्त्यांची कामे करतांना ती निवडणुकीच्या काळात अनेक कंत्राटदारांनी मनाला येईल तशी कामे उरकून बिले वसूल केली आहेत. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी उच्वस्तरीय अधिकाऱ्यांकडून करावी, अशी मागणी आ. कैलास गोरंट्याल यांनी गेल्या महिन्यात आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी याची चौकशी करावी असे पत्र उपायुक्त सूर्यकांत हजारे यांनी दिले असून, अहवाल देण्याचे सांगितले आहे.गोरंट्याल : त्या टेंडर व्यतिरिक्त ही कामेनुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मोठ्या प्रमाणावर जालन्यासह अन्य विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदे अंतर्गत टेंडरचे निकष पूर्ण करताना रस्त्यांच्या कामांचा धडाका लावला होता. हा धडका थेट मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांनी लक्ष घालून तो थांबवला होता.त्यावेळी सर्व टेंडर रद्द करून त्या प्रकरणाची चौकशी देखील प्रस्तावित केली होती. त्यानंतर आता आ. कैलास गोरंट्याल यांच्या या मागणीमुळे कंत्राटदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागMLAआमदारJalna z pजालना जिल्हा परिषदgovernment schemeसरकारी योजना