पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:31 IST2019-04-10T00:30:40+5:302019-04-10T00:31:04+5:30
जालना शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिले.

पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिले. त्यांच्या उपस्थितीत मंगळवारी पालिकेत मुख्याधिकारी तसेच अन्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्या वेळी गोरंट्याल यांनी हे निर्देश दिले.
जालना शहराचे दोन भाग आहेत, नवीन आणि जुना जालना अशी विभागणी आहे. यात नवीन जालना विभागाला घाणेवाडी जलाशयातून पाणीपुरवठा होत होता, परंतु त्या तलावाने आता तळ गाठला आहे. त्यामुळे आता संपूर्ण शहराची तहान आता जायकवाडी पाणीपुरवठा योजनेवरच अवलंबून असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शहराला एका ठराविक वेळी आणि ठराविक वारी पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करण्यावरही चर्चा करण्यात आली. कुठल्या प्रभागाला कधी पाणीपुरवठा होणार, याची यादी तयार करून त्यानुसार पाण्याचे वितरण केल्यासच आगामी पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह माजी आ. कैलास गोरंट्याल यांची उपस्थिती होती.