खरंच, टोलमुक्ती होणार?

By Admin | Updated: August 12, 2015 00:45 IST2015-08-12T00:44:04+5:302015-08-12T00:45:35+5:30

कोल्हापूरकरांत साशंकता : आघाडी सरकारने दोनवेळा केला होता टोल रद्दचा ‘स्टंट’

Indeed, toll will get rid? | खरंच, टोलमुक्ती होणार?

खरंच, टोलमुक्ती होणार?


जालना : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रविवारी रात्री घनसावंगी व जालना शहरात घरफोडी झाल्यानंतर सोमवारी रात्री तीर्थपुरी (ता. घनसावंगी) व धावडा (ता. भोकरदन ) या दोन ठिकाणी घरफोडी झाली.
तीर्थपुरी येथे ५० हजारांची चोरी
तीर्थपुरी : येथील संजय बाबूलाल तापडीया यांच्या किराणा दुकानाचे शटर वाकवून दुकानातील ३० हजाराचे साहित्य व रोख २० हजार असा ५० हजार रुपयांचा ऐवज चार चोरट्यांनी चोरून नेला. या चोरट्यांना वॉचमनने विरोध केला असता त्याला मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री २ वाजता घडली.
तीर्थपुरी येथे नवीन बसस्थानकाजवळील संजय तापडिया यांचे किरकोळ व ठोक किराणा दुकान असून, १० आॅगस्ट रोजी रात्री २ वाजता जोरदार पाऊस सुरू असताना अज्ञात चोर चोरटे त्या ठिकाणी आले. असता तेथे रखवालदार म्हणून एकनाथ मोरे झोपलेला होता. चोरटे येताच तो जागा झाला असता त्याच्यावर तलवारीने वार प्रयत्न केला असता त्याच्या उजव्या हाताला मार लागला. त्याने विरोध करू नये म्हणून बाजूला बसवले तेवढ्यात एक जीप आल्याने चोरटे बाजुला गेले तितक्यात वॉचमन हा तेथून पळाला व गावात जाऊन त्याने मालकास फोन केला. दरम्यान, या चोरट्यांनी शटर वाकवून आत प्रवेश करून आतमधील सिगारेट, पानमसाला असा सुमारे ३० हजार रुपयांचा माल व रोख २० हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्यानंतर चोरटे रात्री २ वाजता पसार झाले. दुकान मालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन गोंदी पोलिसांत चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोकरदन तालुक्यातील धावडा येथील शेख वसीम शेख फय्याज यांची गावात किराणा दुकान आहे. सोमवारी रात्री दुकानबंद करून ते घरी गेले असता मध्यरात्री चोरट्यांनी दुकान फोडून दुकानातील ३० हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पारध पोलीस तसेच जालना येथील ठसेतज्ज्ञांचे पथक दाखल झाले होते. तसेच जालन्यातील श्वान पथक उपलब्ध न झाल्याने औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या श्वान पथकास पाचरण करण्यात आले होते.

Web Title: Indeed, toll will get rid?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.