खाकीची रोगप्रतिकारक शक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST2021-05-22T04:28:34+5:302021-05-22T04:28:34+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत ५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात पहिल्या लाटेत २ तर दुसऱ्या लाटेत तीन जणांचा मूत्यू झाला आहे. ...

खाकीची रोगप्रतिकारक शक्ती वाढली; दुसऱ्या लाटेत कोरोनावर मात ?
जिल्ह्यात आतापर्यंत ५ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. त्यात पहिल्या लाटेत २ तर दुसऱ्या लाटेत तीन जणांचा मूत्यू झाला आहे. पहिल्या लाटेनंतर पोलिसांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्यायामासह हिरव्या पालेभाज्या खाण्याच्या सूचना दिल्या होत्या. असे असतानाही दुसऱ्या लाटेत तब्बल १५० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत सर्वाधिक पोलिसांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ५२ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर ४३ हजारांपेक्षा अधिक जण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत ९०८ जणांचा मृत्यू झाला आहे.
रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रोज व्यायामासह पालेभाज्यांचे सेवन
कोरोनाकाळातही पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर आहे. अशा काळात ते फिट राहण्यासाठी व त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायामासह अंडी, हिरव्या पालेभाज्या खातात.
गतवर्षापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आम्ही सकाळी उठून व्यायाम करतो. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंडी व हिरव्या पालेभाज्या खातो.
समाधान तेलंग्रे, पोलीस कर्मचारी
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आम्हाला कर्तव्यावर राहावे लागते. यासाठी आम्ही दररोज सकाळी व्यायाम करतो. मी बाहेर जेवण करणे सोडले आहे. घरचाच डब्बा खातो.
प्रशांत देशमुख, पोलीस कर्मचारी
गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. या काळात जिल्ह्यातील २२७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. २०२ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.
विक्रांत देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक, जालना