सराफा व्यापा-यांवर आयकरच्या धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:42 IST2018-02-28T00:42:01+5:302018-02-28T00:42:05+5:30
शहरातील चार नामांकित सराफा दुकांनावर मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास आयकर विभागाने एकाच वेळी धाडी टाकल्या.

सराफा व्यापा-यांवर आयकरच्या धाडी
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : शहरातील चार नामांकित सराफा दुकांनावर मंगळवारी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास आयकर विभागाने एकाच वेळी धाडी टाकल्या. रात्री उशिरापर्यंत दस्ताऐवज, रोखे तपासण्याचे काम सुरू होते. एकाच वेळी चार ठिकाणी धाडी पडल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या काही अधिका-यांनी संबंधित दुकानांचे निरीक्षण केले होते. त्यानंतर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली असल्याचे समजते.
सहायक आयुक्त अमित खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दहा ते पंधरा अधिका-यांनी या कारवाईत सहभाग घेतला. कारवाईबाबत संबंधित अधिका-यांनी गोपनीयता पाळणी, त्यामुळे कारवाईचा सविस्तर तपशील मिळू शकला नाही.