आयकर विभागाच्या पथकाकडून जालन्यात दुसऱ्या दिवशीही तपासणी सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:40 IST2025-11-01T17:37:04+5:302025-11-01T17:40:02+5:30
जवळपास २० वाहनांतून आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे जालन्यात दाखल झाले होते.

आयकर विभागाच्या पथकाकडून जालन्यात दुसऱ्या दिवशीही तपासणी सुरूच
जालना : आयकर विभागाच्या मुंबई, नागपूर विभागाच्या पथकांनी गुरुवारी ३० ऑक्टोबर रोजी भल्या पहाटे जालन्यातील चार व्यापारी, उद्योजकांच्या आस्थापना, घरांवर धाडी टाकल्या आहेत. या पथकाकडून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सायंकाळपर्यंतही संबंधितांच्या आस्थापनांसह घरांतील कागदपत्रांसह इतर बाबींची तपासणी सुरूच होती.
जवळपास २० वाहनांतून आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे जालन्यात दाखल झाले होते. कर चुकविणारे, अघोषित संपत्ती असल्याचा संयश असणाऱ्या शहरातील उद्योजक, व्यापारी, ट्रान्स्पोर्ट चालकांच्या आस्थापना, घरांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. २० वाहनांतून आलेले ४० हून अधिक अधिकारी या कारवाईत सहभागी झाले आहेत. दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत ही तपासणी सुरूच होती. त्यामुळे पथकाच्या हाती किती कोटींचे धबाड सापडते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आयकर विभागाच्या या धाडीमुळे जालना शहरातील व्यापारी, उद्योजकांमध्ये चर्चा होत होती.