हाॅटेल प्रकाशगडचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:24 IST2020-12-26T04:24:35+5:302020-12-26T04:24:35+5:30

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सांडू ठोंबरे यांच्या हस्ते उद्घाटन केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे शिवारातील केदारखेडा -भोकरदन मुख्य रस्त्यावरील ...

Inauguration of Hotel Prakashgad in Thatta | हाॅटेल प्रकाशगडचे थाटात उद्घाटन

हाॅटेल प्रकाशगडचे थाटात उद्घाटन

सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सांडू ठोंबरे यांच्या हस्ते उद्घाटन

केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे शिवारातील केदारखेडा -भोकरदन मुख्य रस्त्यावरील हाॅटेल प्रकाशगडचे गुरूवारी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सांडू पाटील ठोंबरे व सुखदेव पाटील ठोंबरे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.

सकाळी विजय सुखदेव ठोंबरे व त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा करण्यात आली. या प्रसंगी गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत, पप्पू ठोंबरे, संदीप शेळके, बबनराव ठोंबरे, लक्ष्मण ठोंबरे, शालिकराव फुके, काकासाहेब फुके, विष्णू गाडेकर, बंटी काका, अनिल जाधव, सुरेश सपकाळ, सुधाकर दानवे, राजू बारुलकर, बी.टी. सपकाळ, सतीश मापारी, विस्तार अधिकारी लहाने, शिंदे, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष मनोहर गायकवाड, सचिव सिध्दार्थ पगारे आदींनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. येणाºया पाहुण्यांचे प्रकाश पाटील ठोंबरे यांनी स्वागत केले. यावेळी चहा, नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. यावेळी येणाºया पाहुण्यांना विविध सुविधांची माहिती देण्यात आली. ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय असल्याचे हॉंटेल प्रकाशगडचे मालक प्रकाश पाटील ठोंबरे यांनी सांगितले.

Web Title: Inauguration of Hotel Prakashgad in Thatta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.