बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचा पदग्रहण समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST2021-02-05T07:57:00+5:302021-02-05T07:57:00+5:30
माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी गोपाळराव बोराडे, बळीराम कडपे, माधवराव कदम, पंकज बोराडे, रवींद्र ...

बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळाचा पदग्रहण समारंभ
माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी गोपाळराव बोराडे, बळीराम कडपे, माधवराव कदम, पंकज बोराडे, रवींद्र तौर, भाऊसाहेब गोरे, जिल्हा परिषद सदस्य इंद्रजित घनवट, शिवाजी सवणे, मोहन अग्रवाल, सरपंच सादेक जहाँगिरदार यांची प्रमुख उपस्थिती होती. आष्टी परिसरातील शेतकरी व व्यापाºयांचा विश्वास संपादन करून बाजार समितीने या भागाचा विकास करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी मोहन अग्रवाल, भाऊसाहेब गोरे, बळीराम कडपे, पंकज बोराडे, गोपाळ बोराडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
नूतन सभापती रमेश सोळंके, निळकंट तौर, बाबासाहेब गाडगे, बाबूराव पवार, गणपत काटे, सुखलाल राठोड, प्रकाश जगताप, सुवर्णकांता लिपणे, मधुकर खरात, इंदूबाई ढवळे, भागवत कडपे, विक्रम पोटे, नारायण खरात, संजय रणसिंगे, विठ्ठल भानुसे, सुदर्शन सोळंके, सुरेश सवणे, तुळशीराम खालापुरे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश सोळंके यांनी तर सूत्रसंचालन डॉ. प्रदीप चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास सूर्यभान मोरे, अशोक आघाव, भाऊसाहेब गणगे, योगेश अवचार, श्रीकृष्ण मिठे, मनोहर पवार, राजेश भुजबळ, खालेक खतीब, गुलाब खरात, दत्ता सुरंग, सुधीर लोणीकर, मंजूळदास सोळंके, रहेमतखान पठाण, ओंकार काटे, मनोज सोळंके, उत्तम पवार, सत्तार कुरेशी, अशोक काटे, परमेश्वर पोटे, हरिभाऊ टेकाळे यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
(फोटो)