केंद्र शासनाच्या वतीने स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत हागणदारीमुक्त कार्यक्रम अधिक सक्रिय करण्यासाठी ‘हागणदारीमुक्त’ या विषयावर ‘घोषवाक्य लेखन स्पर्धा’ १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, सदर ‘घोषवाक्य लेखन स्पर्धे’चा उद्देश हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या कार्यक्रमाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करून लोकसहभाग वाढविणे हा आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा व राज्य पातळीवर गौरविण्यात येणार आहे.
या घोषवाक्य लेखन स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी व ग्रामपंचायतींमधील सर्व गावांनी सहभाग घेणे आवश्यक आहे. ‘हागणदारीमुक्त अधिक’ (ओडीएफ प्लस) या संकल्पनेतील प्रत्येक घटकावर जसे की, शौचालयाचा नियमित वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, ओला - सुका व प्लास्टिक कचरा विलगीकरण आदींबाबत ‘घोषवाक्ये’ लिहिण्यात यावीत. हे संदेश गावातील सार्वजनिक जागा/सभागृह, सरकारी दवाखाने, बाजारपेठा, पोस्ट ऑफिस, बस स्थानक, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी दर्शनी भागात ६ फूट बाय ४ फूट आकारात रंगविण्यात यावेत. यामध्ये मजकूर हा लोकजागृती करणारा व जास्तीतजास्त परिणामकारक असण्यासह सांस्कृतिकदृष्ट्या तसेच तांत्रिकदृष्ट्या योग्य, सर्वसमावेशक आणि आकर्षक असणे आवश्यक आहे.
n १ ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीत ग्रामपंचायतींनी गावातील सार्वजनिक जागा, बाजारपेठा, ग्रामपंचायत कार्यालये, शाळा, सार्वजनिक सभागृह, इमारती आदी ठिकाणी हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) या संकल्पनेतील प्रत्येक घटकावर जास्तीतजास्त ‘घोषवाक्ये’ लिहिणे आवश्यक आहे.
n ९ ते १५ सप्टेंबरदरम्यान ग्रामपंचायतींच्या संबंधित ग्रामसेवकांनी लिहिलेल्या सर्व घोषवाक्यांची छायचित्रे एकत्रितपणे पंचायत समितींना १५ सप्टेंबरपर्यंत सादर करावीत.