शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"मी जातीवादी नसून आरक्षणवादी"; मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त जरांगेंचा संदेश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 12:20 IST

मराठा समाज एकत्र करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण आता माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे.: मनोज जरांगे

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : ''श्रीमंत मराठापासून ते गरीब मराठा एकमेकांना सहकार्य करू लागलेत. तुम्ही एकत्र आल्यामुळे मराठा समाजाकडे अख्ख जग पाहतेय. मराठा समाज एकत्र करणे हे सर्वात मोठे चॅलेंज माझ्यासमोर होतं. पण आता माझा परिवार महाराष्ट्रातील सहा कोटी मराठा समाज आहे. त्यांनी दिलेले योगदान वायाला जाऊ देणार नाही. सर्व असेच एक रहा'', असा संदेश मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षपूर्तीनिमित्त मनोज जरांगे यांनी समाजाला दिला. वर्षभरात काय मिळाले, काही बाकी आहे याबाबत चिंतन करण्यासाठी आज फक्त छोटी बैठक आहे. कोणीही काम बुडवून इकडे येऊ नका, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले. तसेच निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर पुढील भूमिका मांडू, असे जरांगे यांनी स्पष्ट केले. ते आज सकाळी अंतरवाली सराटी येथे प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. 

मराठा आरक्षण आंदोलनाच्या वर्षापूर्तीनिमित्त मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले आहे. त्यानंतर जरांगे म्हणाले, यापूर्वी मराठा समाज एकत्र होत नाही असं बोललं जायचं. यामुळे माझ्या समाजाकडे तिरस्काराने बघितले जायचे. पण मागील वर्षीची २९ तारीख अशी उजडली, समाजाने डरकाळी फोडली.  त्याचा संबंध महाराष्ट्रभर आवाज गेला. २९ ऑगस्ट २०२३ रोजी मराठा समाज एकत्र आला होता. आज वर्षपूर्ती असून यापुढे कितीही मोठे संकट आले तरी एकत्र रहा. कुटुंब एक असेल तर कोणी ते तोडू शकत नाही, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.

मनोज जरांगे यांनी मागील वर्षी २९ ऑगस्ट रोजी पैठण फाटा, शहागड येथे जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता. त्याठिकाणी जाऊन जरांगे यांनी मराठा समाज एकत्र झालाय त्याची येथून सुरूवात झाली, असे म्हणत आठवणींना उजाळा दिला. २९ ऑगस्ट २०२३ रोजी मनोज जरांगे यांनी अंतरावली सराटीतून आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात केली होती.त्यांच्या घटनेस आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त आज अंतरवाली सराटीमध्ये छोटीखानी बैठकीच आयोजन करण्यात आला आहे. यावेळी एका वर्षात समाजाने काय मिळवलं, काय मिळवायचे आहे  यावर चर्चा होणार असल्याची माहिती जरांगे यांनी दिली. 

राज्यातील मराठा समाज एकत्रित येणे गरजेचे. पावणे दोन कोटी मराठी आज ओबीसी आरक्षणात गेले. माझ्या मराठा समाजाला तळमळीने विनंती आहे, एखादी गोष्ट लगेच नाही मिळाली तर चार दिवस उशिरा मिळेल. विजय तुमच्या पायात येऊन पडणार. मी लढायला खंबीर आहे. गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंत होत चालला . त्याला आपण जबाबदार आहोत, असेही म्हणत जरांगे यांनी समाजाचे कान टोचले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना