शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदीपात्रातून दिवसरात्र अवैध वाळू उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST

गोदावरी नदीच्या पलीकडे बीड जिल्ह्याची हद्द सुरू होते, तर अलिकडे जालना जिल्ह्याची हद्द सुरू होते. शहागडच्या औरंगाबाद - सोलापूर ...

गोदावरी नदीच्या पलीकडे बीड जिल्ह्याची हद्द सुरू होते, तर अलिकडे जालना जिल्ह्याची हद्द सुरू होते. शहागडच्या औरंगाबाद - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जोडलेल्या जुन्या पुलाखालून दिवस रात्र अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक केली जात आहे. त्यांना ना महसूलचे भय आहे, ना पोलिसांचे. या अवैध वाळू तस्करांविरुद्ध गेवराई (जि. बीड), शहागड (ता. अंबड) दोन्हीकडील महसूल व पोलीस प्रशासन कारवाई करत नसल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. महसूल व पोलीस यांची भूमिका संशयास्पद असून‌, याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. याबाबत तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी वैद्यकीय रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले.

घरकुलाच्या नावाखाली‌ आपेगावातून वारेमाप अवैध वाळू उत्खनन

घरकुलासाठी वाळू उपलब्ध व्हावी म्हणून आपेगाव येथून शासकीय कामासाठी जेसीबी पोकलेनच्या साहाय्याने वाळूचा उपसा सुरू आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने आपेगाव, शहागड, कुरण, गोंदी परिसरातील वाळू घाटावर लक्ष केंद्रित करून तस्करांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध वाळू उत्खनन व तस्करी बंद व्हावी, याकरिता पालकमंत्री राजेश टोपे यांच्या शिफारशीनुसार पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांना गोंदी पोलीस ठाण्यात आणले. पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ आल्यापासून परिसरातील अवैध वाळू तस्करी पूर्णतः बंद झाली होती.

मात्र काही दिवसापासून दिवसाढवळ्या गोदापात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होताना दिसत आहे.