बसस्थानकातील बेकायदा पार्किंग हटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:09 IST2017-11-22T00:09:41+5:302017-11-22T00:09:50+5:30
बसस्थानकाच्या परिसरात पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या दुचाकी व सायकल पार्किंग परवाना राज्य परिवहन महामंडळाने रद्द केला आहे. त्यामुळे येथील पार्किंग बंद होणार आहे.

बसस्थानकातील बेकायदा पार्किंग हटणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील बसस्थानकाच्या परिसरात पंधरा वर्षांपासून सुरू असलेल्या दुचाकी व सायकल पार्किंग परवाना राज्य परिवहन महामंडळाने रद्द केला आहे. त्यामुळे येथील पार्किंग बंद होणार आहे.
जालना बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या सीना नदीकडील बाजूस परिवहन महामंडळाच्या जागेवर दुचाकी व वाहन पार्किंगची सुविधा आहे. कामानिमित्त बसने बाहेरगावी ये-जा करणारे अनेक जण येथे विशिष्ट रक्कम देऊन दुचाकी पार्किंगसाठी ठेवतात. या जागेबाबत अनेक वर्षांपासून पार्किंग व्यवसाय चालक व राज्य परिवहन मध्यवर्ती बसस्थानक जालना यांच्यात वाद सुरू होता. या वादाचा निकाल आता लागला आहे.
न्यायालयाने पार्किंगची ही जागा परिवहन महामंडळास ताब्यात घेण्याबाबत निकाल दिला आहे. त्यामुळे या पार्किंग स्टँडचा परवाना राज्य परिवहन महामंडळाने रद्द केला आहे. या जागेवर प्रवाशांनी आपली वाहने पार्किंगसाठी उभी करू नयेत, असे विभाग नियंत्रक रवींद्र भुसारी यांनी सांगितले.