शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सत्ता आली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा- आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:05 IST

ते मालक आणि आपण सालगडी असा दृष्टीकोन तयार करून घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : आजची ही निवडणूक ऐतिहासिक आहे. आपण जिंकलो तर राज्याचे राजकारण बदलणार आहे. यासाठी बलुतेदार व आलुतेदार आस लावून बसला आहे. ते मालक आणि आपण सालगडी असा दृष्टीकोन तयार करून घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले.घनसावंगी येथे वंचित बहुजन आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी विष्णू दळवी, विष्णू शेळके, दीपक बोराडे, अ‍ॅड. प्रकाश खरात, राजेंद्र मगरे, शिवाजी सवणे, दीपक डोके यांची प्रमुख उपस्थिती होती. आंबेडकर म्हणाले, जनता हुशार झाली आहे. सर्व उपेक्षित समाज वंचिताच्या झेंड्याखाली एक झाला आहे. संघटन झाले आहे. या देशात एका भाकरीवर जगणाऱ्यांच्या हातात सत्ता का येत नाही, असा सवाल उपस्थित करीत गोदामात अन्न सडते मात्र, ते गरिबाला वाटत नाहीत. गरीब गरीबच राहिला पाहिजे, ही मानसिकता काँग्रेस-राष्ट्रवादीची होती व आता भाजप-सेनेची तीच मानसिकता आहे. यामुळे देशात कुपोषण वाढले आहे.कोल्हापूर व सांगलीत पूरग्रस्तांना सत्ताधाºयांनी मदत न करता हेलिकॉप्टरने पिकनिक केली. सेल्फी घेण्यात ते दंग होते. आम्ही त्या ठिकाणी गेल्यावर सरकार जागे झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात २०० पेक्षा अधिक जागा येणार. ते काय ज्योतिषी आहेत काय, असा सवाल उपस्थित करीत सत्ताधा-यांसह काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवरही आंबेडकर यांनी जोरदार टीका केली.प्रचाराला आता केवळ पाच दिवसच उरले आहेत, कार्यकर्ते, पदाधिका-यांनी जिवाचे रान करून वंचित आघाडीची ध्येय-धोरणे लोकांपर्यंत न्यावीत. ही निवडणूक म्हणजे आपल्यासाठी असलेली मोठी संधी असून, जास्तीत जास्त मतदारांनी आपल्याला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही जागृत ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आंबेडकर यांच्या सभेस घनसावंगीसह अन्य तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची हजेरी होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ लाख रूपये देणार असल्याचे सांगितले. मात्र, कोणालाही १५ लाख रूपये मिळाले नाहीत.१५ लाख मिळणे सोडा, आता ते आपल्या खात्यातील रक्कमही २४ तारखेनंतर काढून घेणार असल्याची टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019ghansawangi-acघनसावंगी