एक लाखावर उत्पन्न असल्यास रेशनकार्ड श्वेत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:08+5:302021-02-08T04:27:08+5:30

जिल्ह्यात अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. कार्ड तपासणी प्रक्रिया सुरू असून, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ...

If the income is above one lakh, the ration card will be white | एक लाखावर उत्पन्न असल्यास रेशनकार्ड श्वेत होणार

एक लाखावर उत्पन्न असल्यास रेशनकार्ड श्वेत होणार

जिल्ह्यात अपात्र शिधापत्रिकाधारकांची शोधमोहीम १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. कार्ड तपासणी प्रक्रिया सुरू असून, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येणाऱ्या समितीवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. ज्यात शोध मोहिमेंतर्गत शिधापत्रिका तपासणीची कार्यपध्दती ठरवणे, शिधापत्रिका तपासणीचा आढावा घेणे, खासगी किंवा सरकारी कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीकडे जर लाभार्थी किंवा केसरी शिधापत्रिका असेल मात्र त्यांचे उत्पन्न १ लाखाच्यावर असेल तर त्याची केशरी शिधापत्रिका रद्द करून त्याजागी श्वेत शिधापत्रिका देणे ही जबाबदारी समितीवर देण्यात आली आहे.

हे पुरावे आवश्यक

भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक, बँक पासबूक, विजेचे देयक, टेलिफोन देयक, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, आदी पुरावे आवश्यक आहेत.

तर रेशनकार्ड रद्द होईल

कार्डधारकांना आवश्यक ते पुरावे सादर करण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाईल. मात्र, तरीही संबंधित व्यक्ती ते आणण्यास असमर्थ ठरली तर त्याचे रेशनकार्ड रद्द करण्यात येईल. तसेच पुराव्याची तपासणी करताना काही संशयास्पद आढळल्यास रेशनकार्ड रद्द केले जाईल.

जिल्हा पुरवठा विभागाकडे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. असे असतानाही शोधमोहीम यशस्वी राबविण्यात येत आहे. यासाठी समिती गठीत करण्यात आली असून, ही समिती पुराव्यांची तपासणी करणार आहे.

रिना बसय्ये, जिल्हा पुरवठा अधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तयार केली जाणार आहे. अद्याप शासनाकडून तसे निर्देश आले नसल्याचे सांगण्यात आले आहे. लवकरच समितीची स्थापना केली जाणार आहे.

Web Title: If the income is above one lakh, the ration card will be white