परतूरसह तालुक्यात ‘हुमणी’ अळीचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 00:33 IST2018-09-17T00:33:03+5:302018-09-17T00:33:19+5:30
‘हुमणी’ अळीने चांगलाच कहर केला असून शेकडो एकरातील उसाबरोबरच आलूचेही पीक धोक्यात आले आहे. या पिकात नांगर घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

परतूरसह तालुक्यात ‘हुमणी’ अळीचा कहर
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालूक्यात ‘हुमणी’ अळीने चांगलाच कहर केला असून शेकडो एकरातील उसाबरोबरच आलूचेही पीक धोक्यात आले आहे. या पिकात नांगर घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
परतूर तालू्क्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र या पिकाला हुमनी आळीने घेरले आहे. ही आळी बुडातच असल्याने व पुर्ण ऊसाचेच नुकसान करत शेतक-यांना या हूमनीमुळे वाळत असलेल्या पिकाकडे बघण्याशिवाय काहीच पर्याय नाही. कारण ही आळी पिकाच्या बुडातच असल्याने या आळीच्या निर्मुलनासाठी फरसा उपाय करता येत नाही.
तालूक्यात पाटोदा, येणारा, माव, एक रूखा, रोहीना, परतूर, चिंचोली आदी शिवारात या हूमनीची लागण ऊसाच्या पिकाला झाली आहे. या आळीमुळे ऊसाचे उभे पिक वाळत आहे. शेतकरी या पिकात जनावरे सोडून, नांगर फिरवत आहेत. या अळीचया निर्मुूलनासाठी कृषि विभागाकडूनही फारसे मार्गदर्शन होत नसल्याच्या शेतकरी तक्रारी करत आहेत.