‘निम्न दुधना’ चे पाणी कसे टिकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:11 AM2017-12-22T01:11:08+5:302017-12-22T01:11:19+5:30

हिवाळ्यातच परभणी आणि पूर्णातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. दोन्ही शहरांना पाणी पुरवठा करणारे प्रकल्प कोरडेठाक पडले असून निम्न दुधनातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे

How will the water of 'lower dudhna' remain? | ‘निम्न दुधना’ चे पाणी कसे टिकणार!

‘निम्न दुधना’ चे पाणी कसे टिकणार!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : हिवाळ्यातच परभणी आणि पूर्णातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. दोन्ही शहरांना पाणी पुरवठा करणारे प्रकल्प कोरडेठाक पडले असून निम्न दुधनातून पाणीपुरवठा करावा लागणार आहे. ६९ टक्के पाणीसाठा असलेल्या निम्न दुधनातून परतूर, सेलूसह ग्रामीण भागात पाणी सोडण्यात येते. त्यामुळे प्रकल्पातील पाणी पावसाळ्यापर्यंत कसे टिकणार, हा प्रश्न घर करू लागला आहे.
परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील पाण्यावर यावर्षी परभणी, पूर्णा शहराचा भार पडणार आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत या शहरांना पाणीटंचाई निवारणार्थ सतत पाणी सोडावे लागणार आहे.
निम्न दूधना प्रकल्पात सध्या ६९ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. या प्रकल्पातून परतूर, सेलू शहरासह ग्रामीण भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्यातच आता परभणी व पूर्णा शहरालाही पाणी सोडण्यात येणार आहे.
या शहरांना मागील दोन महिन्यांपासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यांना पाणीपुरवठा करणारे प्रकल्प आटल्याने निम्न दुधनातून पाणी द्यावे लागणार आहे.
विशेष म्हणजे या प्रकल्पावर यावर्षी पाणीटंचाई निवारणाचा मोठा भार पडणार असल्यााने प्रकल्पातील साठा येत्या पावसाळ्यापर्यंत जतन करुन ठेवण्याची मोठी जबाबदारी प्रकल्प प्रशासनावर येऊन पडली आहे.

Web Title: How will the water of 'lower dudhna' remain?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.